सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा : माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 12:15 PM2021-09-27T12:15:04+5:302021-09-27T12:17:01+5:30

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना दिले आहेत.

E-summons to Shiv Sena leader and former MP Anandrao Adsul | सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा : माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स

सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा : माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स

Next
ठळक मुद्देसिटी को -ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरण

अमरावती : सिटी  को -ऑपरेटिव्ह बँकेतील ९८० कोटीच्या घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार व बँकेचे माजी अध्यक्ष आनंदराव अडसूळ व त्यांच्या पुत्र अभिजित यांना ईडीने समन्स बजावले आहे.

आज सकाळी ईडीचे अधिकारी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील घरी गेल्याची माहिती आहे. सिटी बँक घोटाळा प्रकरणी बडनेराचे आमदार रवी राणा यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून ही कारवाई झाल्याचं बोललं जात आहे. आम्ही सर्व चौकशीला जायला तयार आहे. पण राणा केसचा निकालही निपक्षपाती हवा अशी मागणी अभिजीत अडसूळ यांनी केली आहे. सकाळी छापेमारी सुरू असताना अडसूळ यांची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांना अब्युलन्समधून गोरेगाव  येथील लाईफ लाईन मेडीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी अभिजीत अडसूळ  त्यांच्यासमवेत रुग्णालयात होते. 

काय आहे प्रकरण :

५ जानेवारी रोजी बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप केला. अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्र सादर करण्यासाठी राणा ईडीच्या कार्यालयातही गेले होते. मुंबईमध्ये सिटी को-ऑप बँकेच्या १३ ते १४ शाखा आहेत. या बँकेत ९०० खातेदार असून ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटण्यात आलेलं कर्ज कारणीभूत असल्याचा आरोप रवी राणा यांच्याकडून करण्यात आला होता. अडसूळ यांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. खातेदारांना फक्त एक हजार एवढी रक्कम मिळत असल्याचंही रवी राणा यांनी आपल्या आरोपात म्हटलं होतं.
 

Web Title: E-summons to Shiv Sena leader and former MP Anandrao Adsul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.