चार जुलैला सूर्यापासून पृथ्वीचे अंतर १५२ दशलक्ष किमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:21 PM2019-07-01T12:21:33+5:302019-07-01T12:23:32+5:30
पृथ्वी-सूर्याचे सरासरी अंतर १५ कोटी किमी. असते. मात्र, दर चार वर्षांनी ४ जुलै रोजी पृथ्वीपासून सूर्याचे सर्वाधिक अंतर १५२ दशलक्ष किमी राहणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात 'अॅपीहेलिऑन' म्हणजे अपसूर्य असे म्हणतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पृथ्वी-सूर्याचे सरासरी अंतर १५ कोटी किमी. असते. मात्र, दर चार वर्षांनी ४ जुलै रोजी पृथ्वीपासून सूर्याचे सर्वाधिक अंतर १५२ दशलक्ष किमी राहणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात 'अॅपीहेलिऑन' म्हणजे अपसूर्य असे म्हणतात. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही लंबवर्तुळाकार असल्याने अशी घटना घडत असते.
सूर्य हा तप्त वायूचा गोळा असून, यात हायड्रोजनपासून हेलियम बनण्याची क्रिया अहोरात्र सुरू राहते. सूर्याच्या केंद्रामध्ये एका सेकंदात ६५ कोटी ७० लाख टन हायड्रोजन जळते. त्यापासून ६५ कोटी २५ लाख टन हेलियम तयार होते. कमी झालेल्या ४५ लाख टन वस्तूमानाचे रुपांतर सौर ऊर्जेत होते. सूर्यावरील ज्या भागाचे तापमान कमी होते त्या भागावर सौर डाग पडतात. या डागाचे चक्र ११ वर्षांचे असतात. या डागाचा शोध सन १८४३ मध्ये श्वाबे या वैज्ञानिकाने लावला. या डागाचे आतापर्यंत २३ चक्र पूर्ण झाले आहेत. फेब्रुवारी २००८ पासून २४ वा चक्र सुरू झाले असून, मानवनिर्मित उपग्रहावर या डागाचा परिणाम होत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
एक लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे एक सेमीने ओढली जातेय
जग पाच खंडांत व्याप्त असून, हळूहळू ही पृथ्वी सूर्याकडे सरकू लागली आहे. दर एक लाख वर्षांनी एक सेंटीमीटरने ती सूर्याकडे ओढली जात आहे. न्यूयॉर्क शहर लंडनपासून दरवर्षी २.५ से.मी. दूर सरकल्याचे संशोधन नुकतेच पुढे आल्याचे हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
पाच अब्ज वर्षांनी सूर्याचे बटुक ताऱ्यात रुपांतर
सूर्याचे वय १० अब्ज वर्ष वैज्ञानिक सर ऑर्थर एडींग्टन यांनी निश्चित केले आहे. त्यापैकी ५ अब्ज वर्षे निघून गेले असून, उर्वरित पाच अब्ज वर्षानंतर सूर्याचे अंत होऊन बटू ताऱ्यात रुपांतर होईल. सूर्याकडून चुंबकीय लहरी फेकºया जात असल्याने कधी-कधी चुंबकीय वादळे आल्याचे सांगण्यात आले आहे. सन १८५९ मध्ये ते वादळ आल्याने जगातील टेलीग्राफ यंत्रणा बंद पडल्याची खगोलशास्त्रात नोंद आहे. या वादळाला 'केरीगटन' इव्हेंट' हे नाव दिले होते. या वादळाने सॅटेलाईट, जीपीएस यंत्रणा पूर्णपणे बंद पडतात.
४ जुलैला पृथ्वी-सूर्य हे अंतर अधिक असण्याचा सजीव सृष्टीवर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही. मात्र, सूर्याकडे साध्या डोळ्यांनी थेट पाहिल्यास धोका संभवण्याची शक्यता आहे.
- विजय गिरुळकर, हौशी खगोल अभ्यासक, अमरावती