खा. बळवंत वानखडे यांचा विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा
By जितेंद्र दखने | Updated: June 12, 2024 19:37 IST2024-06-12T19:37:34+5:302024-06-12T19:37:47+5:30
विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे बुधवार, १२ जून रोजी सोपविला.

खा. बळवंत वानखडे यांचा विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा
जितेंद्र दखने- अमरावती
अमरावती : जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार तसेच दर्यापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे यांनी आपल्या विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे बुधवार, १२ जून रोजी सोपविला.
लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी विजयी मिळविला. लेहगाव ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, दर्यापूर बाजार समिती संचालक, जिल्हा परिषद सदस्य, आरोग्य व वित्त सभापती, विधानसभा सदस्य, जिल्हा मध्यवर्ती व सहकारी बँक संचालक ते खासदार असा प्रवास करणारे बळवंत वानखडे यांनी ज्या-ज्या पदावर कार्य केले, तेथील कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदर त्यांना नवीन पदावर आरूढ व्हावे लागले, हे विशेष. २४ जूनपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होणार असून,त्यात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी होणार आहे.