१२.५0 कोटींच्या अनुदानाला ग्रहण
By Admin | Published: June 5, 2014 11:40 PM2014-06-05T23:40:45+5:302014-06-05T23:40:45+5:30
महापालिकेत एलबीटीची तूट भरून काढण्यासाठी शासनाने दिलेल्या मूलभूत सोई- सुविधांच्या २५ पैकी १२.५0 कोटींच्या विकास कामांचा वाद अद्यापही कायम आहे. याप्रकरणी आ. रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांकडून
विकास कामांची यादी अडकली : विभागीय आयुक्तांच्या पत्राने पेच
अमरावती : महापालिकेत एलबीटीची तूट भरून काढण्यासाठी शासनाने दिलेल्या मूलभूत सोई- सुविधांच्या २५ पैकी १२.५0 कोटींच्या विकास कामांचा वाद अद्यापही कायम आहे. याप्रकरणी आ. रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांकडून पत्र आणल्याने या अनुदानाला ग्रहण लागल्याचे चित्र आहे. अनुदान वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि फ्रंट यांच्यात संघर्षाची चिन्हे निर्माण झाली आहेत.
सन २0१२ मध्ये शासनाने महापालिकेला २५ कोटींचे अनुदान दिले होते. अमरावती व बडनेरा मतदार संघात प्रत्येकी १२.५0कोटी रूपयांची कामे करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार अमरावती मतदारसंघातील १२.५0 कोटींची विकास कामे महापालिकेच्या बांधकाम यंत्रणेने हाताळली; मात्र बडनेरा मतदारसंघातील विकास कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यासाठी राणा यांनी शासनाकडून पत्र आणले. त्यानुसार महापालिकेने १२.५0 कोटींचा धनादेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळती केला.