बाजार समितीविरोधात प्रहारचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:25 AM2018-02-16T01:25:27+5:302018-02-16T01:25:56+5:30
स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख प्रदीप निमकाळे यांनी बुधवारी अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख प्रदीप निमकाळे यांनी बुधवारी अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात केली.
बाजार समितीला लागून असलेली ०.४६ आर जागा मिळावी, यासाठी २००३ पासून प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी समितीने ७३ लाखांचा भरणा केला. उर्वरित रक्कम भरून जागा हस्तगत करावी, असे पत्र जिल्हाधिकाºयांनी दिले असताना २९ जानेवारीच्या सभेत ठराव घेतला नाही, तर वकिलाच्या सल्ल्यानंतर जागेचा विचार केला जाईल, असा शब्दप्रयोग झाला. जागेसंदर्भात वेळकाढू धोरण राबवून ती मूळ मालकाला जाऊ देण्याचा घाट बाजार समितीचे संचालक घालत आहेत. या व्यवहारात भ्रष्टाचार झाला आहे. २०१७ मधील नाफेड तूर खरेदीत बाजार समितीच्या संचालकांनी प्रचंड आनियमितता केली. संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनानंतर गठित चौकशी समितीचा अंतिम निर्णय अजूनही अप्राप्त आहे. यांसह अनेक मुद्द्यांवर प्रदीप निमकाळे यांच्या नेतृत्वात बाजार समितीतीसमोरच अन्नत्याग आंदोलनसुरू आहे.