महाडीबीटीमुळे शेतक-यांची आर्थिक पिळवणूक , शासन , प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:10 AM2021-07-03T04:10:12+5:302021-07-03T04:10:12+5:30
प्रतिक्रिया , कृषि विभागाची ही महत्वाकांक्षी योजना जरी असली तरी शेतक-याला अर्ज करतांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतोय आणि ...
प्रतिक्रिया ,
कृषि विभागाची ही महत्वाकांक्षी योजना जरी असली तरी शेतक-याला अर्ज करतांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतोय आणि अर्जाची निवड होईल याची खात्री नाही. त्यामुळे सेतु चालक व सी एस सी सेंटर यांच्याकडून आकारण्यात येणा-या फी च्या संदर्भात एक सूत्रता आणावी जंनेकरून शेतक-याला आर्थिक फटका बसणार नाही
शरद भि वानखडे ( उप सभापती पंचायत समिती , तिवसा )
प्रतिक्रिया ,
मी डीबीटी वर प्रमाणित बियाण्यासाठी माझा , माझ्या भावाचा व माझ्या वडीलाच्या नावे एकुण तीन अर्ज केले त्याचा मला प्रती अर्ज २०० /- रु याप्रमाणे ६०० रु खर्च आला आणि ऑनलाइन लॉटरीमध्ये आमच्यापैकी एकाचाही नंबर लागला नाही. त्यामुळे मला नाहक आर्थिक फटका बसला. असे माझ्यासारखे अनेक शेतकरी आहे. त्यामुळे शासनाने याबाबत काही मार्ग काढावा जंनेकरून आमचा खर्च कमी होईल.
विनोद र बंगरे ( शेतकरी )