सात वर्षात अर्थव्यवस्था ढासळली, मोदी सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:10 AM2021-05-31T04:10:09+5:302021-05-31T04:10:09+5:30

अमरावती : केंद्रातील मोदी सरकारच्या अपयशाचे ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात देशाची ...

The economy collapsed in seven years, the Modi government protested | सात वर्षात अर्थव्यवस्था ढासळली, मोदी सरकारचा निषेध

सात वर्षात अर्थव्यवस्था ढासळली, मोदी सरकारचा निषेध

Next

अमरावती : केंद्रातील मोदी सरकारच्या अपयशाचे ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात देशाची अर्थव्यवस्था ढासळली. कोरोनाकाळात सरकार नियोजनशून्य ठरले. दररोज पेट्रोल डिझेल व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ होत आहे. जीएसटी व नोटबंदीसारखे अपयशी निर्णय, देशातील वाढती बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या विरोधात काळे कायदे केंद्र शासनाने आणले. त्याचा शहर व जिल्हा कॉग्रेस कमिटीद्वारे रविवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला.

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून अमरावती शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फलक व काळे झेंडे दाखविण्यात आले. आंदोलनात आ. सुलभा खोडके, आ. बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, भैया पवार, माजी महापौर विलास इंगोले, सुधाकरराव भारसाकळे, प्रकाश साबळे, संजय वाघ, भैयासाहेब निचळ, हरिभाऊ मोहोड, राजीव भेले, शोभा शिंदे, प्रशांत डवरे, सलीम बेग, अनिल माधोगढिया, फिरोज खान, कांचनमाला गावंडे, सुजाता झाडे, जयश्री वानखडे, योगिता गिरासे, सुरेश रतावा, राजाभाऊ चौधरी, नीलेश गुहे, राजा बांगडे, अब्दुल रफीक, पंकज मोरे, सागर यादव, रमेश राजोटे, ऋग्वेद सरोदे, राजेश चव्हाण, हुसैन बगदादी, राजेश ठाकूर, मुकेश छांगाणी, अभिनंदन पेंढारी, हाजी रफीक, श्याम देशमुख, अरुण रामेकर, संदेश जैन, आकाश तायडे, अशोक रेवस्कार, शम्स परवेज, सुनील महल्ले, सोहन कुरील, प्रभाकर वाळसे, झिया खान, सुनील कांडलकर, गजानन राजगुरे, खोजयमा खुर्रम, असलम सलाट, राजेश ठाकूर, अभय ढोबळे, राजेंद्र भंसाली, राहुल तायडे, रज्जू बाबा, अतुल काळबेंडे, प्रथमेश गवई, प्रकाश पहुरकर, संजय बोबडे, किशोर रायबोले, अभिनय अभ्यंकर, प्रकाश नांदूरकर, संजय मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: The economy collapsed in seven years, the Modi government protested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.