शैक्षणिक बाजारपेठ थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:00:09+5:30

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नवे शैक्षणिक सत्र लांबणीवर गेले आहे. परिणामी शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्वच व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. आधीच गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊनचा फटका सोसत असताना, व्यवसाय प्रभावित झाल्याने त्यांना प्रचंड आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

The educational market cooled | शैक्षणिक बाजारपेठ थंडावली

शैक्षणिक बाजारपेठ थंडावली

Next
ठळक मुद्देशाळा लॉकडाऊन : ऑनलाईनवर भर, मोफत पुस्तके घरी, साहित्य खरेदीस ना

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : दरवर्षी जून महिन्याच्या अखेरीस खासगी तसेच सर्व माध्यमांच्या शाळा सुरू होतात. परंतु, यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नवे शैक्षणिक सत्र लांबणीवर गेले आहे. परिणामी शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्वच व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. आधीच गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊनचा फटका सोसत असताना, व्यवसाय प्रभावित झाल्याने त्यांना प्रचंड आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
जून महिन्यात जवळपास सर्व शाळांचे नवे शैक्षणिक सत्र सुरू होते. नवे दप्तर, गणवेश, नवे-कोरे नोटबूक, पाठ्यपुस्तके, वॉटर बॅग या सर्वच प्रकारच्या शैक्षणिक साहित्याची खरेदी शाळा सुरू होण्यापूर्वीच केली जाते. संपूर्ण तयारी करून विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी सज्ज असतात. परंतु, यंदा परिस्थिती तशी नाही. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे मार्च महिन्यात परीक्षा आटोपण्यापूर्वीच शाळांना कुलूप लागले. शाळा विद्यार्थ्यांकरिता लॉकडाऊनच आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाठ्यपुस्तके खरेदी तूर्तास टाळली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधूनच शालेय साहित्य खरेदी अनिवार्य आहे. शैक्षणिक साहित्याच्या क्षेत्रात अनेक लहान-मोठे व्यावसायिक आहेत. यात गणवेश, दप्तर, वॉटर बॅग, रेनकोट, बूट असे साहित्य विक्री करणाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

जूननंतरही ‘जैसे थे’
चार महिने घरीच सुट्या घालवल्यानंतरही सद्यस्थितीमुळे शाळा सुरू होण्याचा निर्णयाबाबत संभ्रमाची स्थिती आहे. या बाबीचा परिणाम शैक्षणिक साहित्य विक्री व्यवसायात असणाºया व्यावसायिकांवर झाला आहे. त्यांना गतवर्षीचे साहित्य ‘क्लीअर’ करता आलेले नाही, यंदा नवीन साहित्यदेखील त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही. तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे त्यांना आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. जून महिन्यानंतर सारे काही व्यवस्थित होईल, अशी आशा होती; परंतु त्यावरही कोरोनाच्या संकटाने पाणी फेरले आहे.

प्रतिसाद नाही
शैक्षणिक सत्रावर कोरोनाचे सावट असल्याने साहित्य खरेदीला पालकांचा प्रतिसाद नाही. पहिली व पाचवीचे प्रवेश रखडले आहेत. ऑनलाईन अभ्यासाला सुरुवात झाली असली तरी शाळेत पुढील काही दिवस तरी जायचेच नसल्याने मोफत पाठ्यपुस्तके वगळता विद्यार्थ्यांनी काहीही घेतलेले नाही.

पालकांकडे लकडा
शैक्षणिक आयुष्याच्या पहिल्या टप्प्यावर असलेले केजी-२ ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी मात्र नवीन शालेय साहित्य खरेदी करण्याचा लक़डा पालकांकडे लावत आहेत.

Web Title: The educational market cooled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार