ई-पीक पाहणी कार्यक्रम प्रभावीपणे राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:17 AM2021-08-21T04:17:18+5:302021-08-21T04:17:18+5:30

अमरावती : शासनाने पिकांच्या संदर्भासाठी ई-पीक पाहणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सर्व पिकांची स्थिती आणि आकडेवारी एकत्रितरीत्या ...

Effectively implement e-crop inspection program | ई-पीक पाहणी कार्यक्रम प्रभावीपणे राबवा

ई-पीक पाहणी कार्यक्रम प्रभावीपणे राबवा

Next

अमरावती : शासनाने पिकांच्या संदर्भासाठी ई-पीक पाहणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सर्व पिकांची स्थिती आणि आकडेवारी एकत्रितरीत्या उपलब्ध होण्यास मदत मिळेल. त्यामुळे महसूल आणि कृषी विभाग यांनी संयुक्तपणे प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यंत्रणेला दिले आहेत.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी प्रशासकीय बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर, जि.प. अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार किरण सरनाईक, बळवंत वानखडे, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर मिना, जिल्हाधिकारी पवनीत कौर, सीईओ अविश्यांत पंडा, पोलीस आयुक्त आरती सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक एन. हरीबालाजी, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे आदी उपस्थित होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अजून टळलेला नाही. आरोग्य यंत्रणांनी ही लाट ऑक्टोबरपर्यंत येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी खाटांची उपलब्धता, ऑक्सिजनची व्यवस्था यांचे नियोजन योग्य पद्धतीने करण्यासोबतच लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूृचनाही त्यांनी दिल्या.

बॉक्स

परवानगी प्रक्रिया सुलभ करा

रेतीघाटाबाबत पर्यावरणविषयक मान्यता आणि जनसुनावणी वेळेत होण्याबाबत कार्यवाही करून प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उपाययोजना सूचवाव्यात. कृषक जमिनींना अकृषक परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ आणि गतिमान करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिलेत.

बॉक्स

अमरावती शहर ग्रामीण तहसील वेगळे करा

महसूल यंत्रणांना वाहने उपलब्ध करून द्यावीत, तसेच अमरावती तहसील कार्यालयावरील ताण पाहता शहर व ग्रामीण परिसर यांच्यासाठी स्वतंत्र तहसील निर्मितीच्या शक्यता तपासून प्रस्ताव सादर करावा, त्यामुळे अमरावती तहसीलवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत मिळेल. शहर आणि लगतच्या परिसरात सातबारा आणि मिळकत पत्रिका अशी दुहेरी पद्धती अवलंबिली जाते, ही जाचक असल्यामुळे यामध्ये सुधारणा करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

Web Title: Effectively implement e-crop inspection program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.