आठ जोडप्यांनी नोंदणी कार्यालयात बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 01:49 AM2024-02-15T01:49:26+5:302024-02-15T01:50:07+5:30

१४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणजे अर्थात प्रेमाचा दिवस. त्याची चाहूल लागते ती तरुणाईच्या गिफ्ट व इतर वस्तूंच्या खरेदीतून.

Eight couples tied the knot at the marriage registration office | आठ जोडप्यांनी नोंदणी कार्यालयात बांधली लग्नगाठ

आठ जोडप्यांनी नोंदणी कार्यालयात बांधली लग्नगाठ

मनीष तसरे -

अमरावती : ‘व्हॅलेंटाईन डे' काही जोडप्यांसाठी ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ ठरला. तब्बल आठ युगुलांनी जन्मजन्मांतरी सोबत राहण्याची शपथच नव्हे, तर त्यावर अंमलदेखील केला. विवाह नोंदणी कार्यालय गाठून धूमधडाक्यात प्रेमाचा बार उडवला. त्यांच्यासाठी पुढील आयुष्यात या दिवसाच्या प्रेममयी आठवणी कायम स्मरत राहतील, हे नक्की.

१४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणजे अर्थात प्रेमाचा दिवस. त्याची चाहूल लागते ती तरुणाईच्या गिफ्ट व इतर वस्तूंच्या खरेदीतून. अलीकडे या दिवसाचा जोम ओसरला आणि पर्यायाने त्याला कडाडून होणारा विरोधाचा सूरदेखील मावळला. तथापि, या दिवसाची आठवण ठेवत काही जणांचे नियोजन असते. अशा आठ जोडप्यांचे नियोजन विवाह नोंदणी कार्यालयाच्या मध्यस्थीने तडीस गेले आणि ते एकमेकांच्या प्रेमपाशात बांधले गेले आहेत.

‘तो’ पाच जिल्हे ओलांडून आला
लग्नबंधनात अडकण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून निरंजन मेश्राम पाच जिल्हे ओलांडून अमरावतीला नातेवाइकांसह आला. रसिका कुंभलवार हिच्याशी विवाह बंधनात अडकण्यासाठी नोंदणी कार्यालय गाठले. आजचा प्रेमदिन आहे. आमचा प्रेम विवाह नसला तरी व्हॅलेंटाईन डे असल्याने हा दिवस कायम स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया निरंजनने ‘लोकमत’ला दिली.
 

Web Title: Eight couples tied the knot at the marriage registration office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.