विज्ञान, तंत्रज्ञान विषयाला आठ तासिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 10:44 PM2018-06-17T22:44:58+5:302018-06-17T22:45:12+5:30
येत्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ९ व १० वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाला आठवडयाच्या आठ तासिका मिळाल्या आहेत. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या शासन परिपत्रकात या तासिकांची विभागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येत्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ९ व १० वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाला आठवडयाच्या आठ तासिका मिळाल्या आहेत. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या शासन परिपत्रकात या तासिकांची विभागणी केली आहे.
शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि विशेष कार्यक्रम अधिकारी प्राची साठे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याचे हे यश मानले जात आहे. शेखर भोयर यांना यासंदर्भात अमरावती विभाग तसेच राज्याच्या विविध विभागातून निवेदने प्राप्त झाली होती. विशेष म्हणजे हा मुद्दा सर्वप्रथम शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी उचलून धरला होता.
शैक्षणिक सत्र २०१७-२०१८ मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा कार्यभार केवळ सात तासिकांचा होता. शिवाय केवळ एकच पुस्तक उपलब्ध होते. त्यामुळे या विषयाचे दोन स्वतंत्र भाग करण्यात यावे व आठ तासिकांचा कार्यभार देण्यात यावा, जेणेकरून शिक्षक व विद्यार्थी यांच्यावर अन्याय होणार नाही, अशी मागणी शासन दरबारी शेखर भोयर यांनी केली होती. या विषयाचा सतत पाठपुरावा सुरु होता. या विषयाचे अगोदरच स्वतंत्र भाग मंजूर झाले आहे.
या निर्णयामुळे विज्ञान शिक्षक व विज्ञानप्रेमी यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण संचारला आहे. त्यानुसार विषय शिक्षकांना न्याय मिळाला आहे. शेखर भोयर हे शिक्षकांच्या समस्या निवारण्यासाठी सतत झटत असून, ती समस्या निकाली निघेपर्यंत पाठपुरावा करतात. अखेर त्यांच्या पाठपुराव्यामुळे शिक्षकांना विषयाच्या आठवड्याला ८ तासिका मिळाल्या आहेत.