‘स्थायी’च्या आठ सदस्यांची आमसभेत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:35 AM2021-02-20T04:35:11+5:302021-02-20T04:35:11+5:30
अमरावती : महापालिकेत गुरुवारी झालेल्या आमसभेत स्थायी समितीच्या आठ सादस्यांची निवड करण्यात आली. याशिवाय शिवसेनेच्या गटनेतेपदी राजेंद्र तायडे यांची ...
अमरावती : महापालिकेत गुरुवारी झालेल्या आमसभेत स्थायी समितीच्या आठ सादस्यांची निवड करण्यात आली. याशिवाय शिवसेनेच्या गटनेतेपदी राजेंद्र तायडे यांची निवड करण्यात आली व काही प्रशासकीत विषयांच्या मंजूरीनंतर आमसभा स्थगीत करण्यात आली.
महापालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात फेब्रुवारी महिन्याची आमसभा व्हीसीद्वारे आयोजित करण्यात आली. स्थायी समितीचे दरवर्षी आठ सदस्य निवृत्त होतात व त्यांच्या जागी नव्या आठ सदस्यांची निवड आमसभेत करण्यात येते. संबंधित गटनेत्यांनी सभागृहातील संख्येनूसार त्यांच्या पक्षाचे वाट्याला आलेल्या सदस्यांची नावे सभापती चेतन गावंडे यांना सादर केली व त्यांनी ही नावे सभागृहात वाचून दाखविली.
यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्वाती चंद्रशेखर कुळकर्णी, रिता सुनील पडोळे, सुनंदा विनोद खरड, सचिन विजयकुमार रासने, गोपाल दामोदर धर्माळे, चंद्रकांत लक्ष्मनराव बोमरे तसेच बहुजन समाज पक्षाचे चेतन पवार, शिवसेनेच्या जयश्री कुºहेकर यांचा समावेश आहे. याशिवाय याच सभेत एमआयएमचे मोहमद इमरान यांनी स्थायच्यिा सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी अफजल हुसेन मुबारक हुसेन यांची निवड करण्यात आली.