आठ तालुके वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:27 PM2019-01-27T22:27:08+5:302019-01-27T22:28:00+5:30

गतवर्षीच्या बाधित खरिपामुळे दुष्काळ जाहीर पाच तालुक्यांसाठी २६९.६५ कोटींच्या मदतनिधीला शासनाने शुक्रवारी प्रशासकीय मान्यता दिली. यामध्ये जिल्ह्यातील कमी पैसेवारीचा धारणी वगळता आठ तालुक्यांतील १०२० गावांसह दुष्काळसदृश स्थिती जाहीर १५ महसूल मंडळांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन टप्प्यांमध्ये व दोन हेक्टर मर्यादेत हा निधी वितरित होईल. यापैकी पहिल्या टप्प्याच्या ५५.२२ कोटींचा निधी वितरणास शासनाने मान्यता दिली आहे.

Eight talukas wind | आठ तालुके वाऱ्यावर

आठ तालुके वाऱ्यावर

Next
ठळक मुद्देपाच तालुक्यांना २७० कोटी : दुष्काळसदृश जाहीर १६ मंडळांसह १०२० गावांना डावलले

गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गतवर्षीच्या बाधित खरिपामुळे दुष्काळ जाहीर पाच तालुक्यांसाठी २६९.६५ कोटींच्या मदतनिधीला शासनाने शुक्रवारी प्रशासकीय मान्यता दिली. यामध्ये जिल्ह्यातील कमी पैसेवारीचा धारणी वगळता आठ तालुक्यांतील १०२० गावांसह दुष्काळसदृश स्थिती जाहीर १५ महसूल मंडळांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन टप्प्यांमध्ये व दोन हेक्टर मर्यादेत हा निधी वितरित होईल. यापैकी पहिल्या टप्प्याच्या ५५.२२ कोटींचा निधी वितरणास शासनाने मान्यता दिली आहे.
जिल्ह्यात ३१ आॅक्टोबर २०१८ चे शासन निर्णयाप्रमाणे मोर्शी तालुक्यात तीव्र स्वरूपाचा व अंजनगाव सुर्जी, अचलपूर, वरूड, धारणी तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला. याव्यतिरिक्त ६ नोव्हेंबर २०१८ च्या निर्णयाप्रमाणे १६ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृशस्थिती जाहीर करून आठ प्रकारच्या सवलती देण्यात आल्यात. मात्र, या १६ महसूल मंडळांना दुष्काळ निधीमधून डावलण्यात आलेले आहेत. यंदाचा खरीप हंगाम बाधित झाल्याने धारणी वगळता जिल्ह्यातील १ हजार ८०५ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यापैकी दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या पाच तालुक्यांव्यतिरिक्त १ हजार २० गावांना या मदतनिधीपासून डावलण्यात आल्याची बाब आता स्पष्ट झालेली आहे.
शेतीपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या क्षेत्रात दोन हेक्टर मर्यादेत दोन टप्प्यात मदतनिधीचे वाटप होणार आहे. यामध्ये एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे प्रतिहेक्टर सहा हजार ८०० रूपयांच्या ५० टक्के म्हणजेच ३ हजार ४०० रूपये प्रति हेक्टर किंवा एक हजार रूपये यापैकी जी रक्कम अधिक असेल ती रक्कम पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात येणार आहे.
बहुवार्षिक पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्यास प्रतिहेक्टर देय १८ हजार रूपयांपैकी पहिल्या टप्प्यात ९ हजार किंवा किमान दोन यापैकी जी रक्कम अधिक असेल, ती पीक बाधित शेतकºयाला प्रदान करण्यात येणार आहे. ही मदत दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेतच देण्यात येणार असल्याचे महसूल विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
दुष्काळी तालुक्यांना निधी जाहीर
मदतनिधीतून कर्जकपात नाही

मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यामधून कोणत्याही बँकेला कुठल्याच प्रकारची वसुली करता येणार नसल्याची बाब महसूल विभागाने स्पष्ट केली आहे.
बहुवार्षिक पिकांसाठी ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याची खातरजमा पंचनाम्याम्याद्वारे करण्यात येईल. मात्र, यासोबत जीपीएस इनबिल्ट फोटो आवश्यक राहणार आहे.
३३ टक्के बाधित क्षेत्र ठरविण्यासाठी अंतिम पैसेवारीसाठी झालेल्या पीक कापणी प्रयोगातील उत्पन्नाचा आधार घेतला जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायतनिहाय काढण्यात आलेले उत्पन्न ग्राह्य धरले जाणार आहेत.
१ हजार २० गावांवर अन्याय
दुष्काळाच्या नव्या संहितेनुसार शासनाने ३१ आॅक्टोबरला जिल्ह्यातील धारणी, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, वरूड व मोर्शी तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. याच गावांना मदतनिधी मिळेल. ६ नोव्हेंबरला ७५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाच्या आधारावर १५ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली. या मंडळांना यातून डावलले. याव्यतिरिक्त कमी पैसेवारीच्या पाच दुष्काळ तालुके वगळता उर्वरित नऊ तालुक्यांतील १०२० गावांना मदतनिधीतून डावण्यात आलेले आहे.

Web Title: Eight talukas wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.