रस्त्यावर सापडलेले आठ हजार रुपये पोलिसांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:13 AM2021-03-08T04:13:43+5:302021-03-08T04:13:43+5:30
निवृत्त गुरुजींची प्रामाणिकता : वरूड : निवृत्त शिक्षक सायंकाळी शतपावली करीत असताना, पांढुर्णा चौक परिसरात त्यांच्या पुढ्यात दुचाकीस्वार युवकाचे ...
निवृत्त गुरुजींची प्रामाणिकता :
वरूड : निवृत्त शिक्षक सायंकाळी शतपावली करीत असताना, पांढुर्णा चौक परिसरात त्यांच्या पुढ्यात दुचाकीस्वार युवकाचे खिशातील पैसे पडले. त्याचवेळी या गुरुजींनी आवाज दिला, परंतु तो निघून गेला. एक दिवस वाट पाहूनही तो परत आला नसल्याने अखेर वरुड पोलीस ठाणे गाठून ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्याकडे ७ हजार ९५० रुपये जमा करण्यात येऊन तशी नोंद घेण्यात आली.
१ मार्च रोजी हा प्रकार घडला होता. दुसऱ्या दिवशी सुद्धा शोध घेतला. परंतु, तो युवक फिरकला नसल्याने अखेर नितीन जीवरकर व रमेश पाटील या दोन्ही निवृत्त शिक्षकांनी पोलीस ठाणे गाठले. हरवलेली रक्कम कुणाची असेल, त्यांनी आधार ओळखपत्र दाखवून पोलीस ठाण्यातून घेऊन जावी, असे आवाहन ठाणेदार प्रदीप चौगावकार यांनी केले आहे .