आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, जंगलात पळालेल्या आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 15:02 IST2021-08-16T15:01:47+5:302021-08-16T15:02:29+5:30
Amravati News शौचास गेलेल्या एका आठ वर्षीय चिमुकलीवर २८ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना शनिवारी चिखलदरा येथे उघडकीस आली.

आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, जंगलात पळालेल्या आरोपीस अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: शौचास गेलेल्या एका आठ वर्षीय चिमुकलीवर २८ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना शनिवारी चिखलदरा येथे उघडकीस आली. पळून गेलेल्या नराधमाला १५ ऑगस्ट रोजी जंगलातून अटक केली. अरुण डेबा भुसूम (रा. भिलखेडा) आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर चिमुकलीची प्रकृती खालावल्याने एका शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे.
तालुक्यातील एका गावात चिमुकली शुक्रवारी दुपारी ४ वाजता शौचास जात असताना आरोपीने एक-एक कपडे काढून अत्याचार केला. आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ (अ ब), ५०६ सहकलम ४ पोक्सो. अन्वये गुन्हा दाखल केला. चिमुकलीचे आई-वडील सकाळी शेतात गेले होते. सायंकाळी ६ वाजता ते परत आले असता, चिमुकली रडताना दिसली. कारण कळताच पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता, तो घटनास्थळावरून पसार झाला होता. रविवारी त्याला जंगलातून अटक करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनात सपोनि शितल निमजे, एएसआय सुरेश राठोड, जमादार चैत्राम ठाकरे, आशिष वरघट, अमोल गायकवाड, शेख इम्तियाज करीत आहेत.