आठ वर्षांत वनविभागातील ८२२ अधिकारी, कर्मचा-यांचा मृत्यू, कर्तव्यावरील मृत्यू दहा टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 06:31 PM2019-06-12T18:31:45+5:302019-06-12T18:32:16+5:30
- अनिल कडू परतवाडा ( अमरावती ) - राज्य वनविभागाच्या वार्षिक प्रशासकीय अहवालानुसार २००९ ते २०१८ या आठ वर्षांच्या ...
- अनिल कडू
परतवाडा (अमरावती) - राज्य वनविभागाच्या वार्षिक प्रशासकीय अहवालानुसार २००९ ते २०१८ या आठ वर्षांच्या कालावधीत वनविभागातील ८२२ वनअधिकारी व कर्मचा-यांच्या अकाली, अपघाती व कर्तव्यादरम्यान मृत्युमुखी पडले. ही संख्या एकूण पदांच्या १० टक्के आहे. गडचिरोली, अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागातील कर्मचा-यांची संख्या यात अधिक आहे.
वार्षिक प्रशासनिक अहवालानुसार, आठ वर्षात ४ हजार ६२८ वन अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. १५७ लोक नोकरी सोडून गेले असून, ५५४ अधिकारी-कर्मचारी निलंबित तर ५८ बडतर्फ झाले आहेत.
वनसंरक्षणाचे मूलभूत कर्तव्यातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचा-यांचे वेतन, अपु-या सुविधा, कामाचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव, साप्ताहिक रजा व वैद्यकीय सवलती न देणे, आघाडीवर लढणा-या घटकाची उपेक्षा या आणि अन्य कारणांमुळे कर्मचारी-अधिका-यांच्या एकूण संख्येपैकी १० टक्के लोक मृत्यूला कवटाळत असल्याचे वनविभागातील कर्मचारी व अधिकाºयांच्या संघटनांनी स्पष्ट केले.
वनविभागातील कर्मचारी व अधिका-यांच्या व्हॉट्अॅप ग्रुपवर हा वार्षिक अहवाल शेअर केला जात आहे. यातील आकडेवारी बघून चिंतेसह हळहळ व्यक्त होते आहे.
वनविभागातील आठ वर्षातील ८२२ वनअधिकारी व कर्मचा-यांच्या मृत्यूबाबत केंद्र व राज्याचा मानवाधिकार आयोग, मागासवर्गीय व अल्पसंख्याक आयोग, महिला आयोग यांनी दखल घेतलेली नाही. मृत्यूमूखी पडलेल्या या कर्मचा-यांच्या कुटुंबीयांना तीन ते सहा महिन्यांत योग्य तो लाभही वनविभागाकडून तात्काळ दिलेला नाही. वनविभागातील उच्चपदस्थांनीही या कुटुंबांचे सांंत्वन केले नाही, असे कर्मचारी-अधिकारी यांच्या संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
वनअधिकारी व कर्मचा-यांच्या मृत्यूची आकडेवारी अशी -
वर्ष सर्कल मृत्यू
२०१७-१८ अमरावती १२
गडचिरोली १५
नागपूर १२
२०१६-१७ अमरावती ०९
गडचिरोली २३
चंद्रपूर ०९
नागपूर १२
यवतमाळ ०५
२०१५-१६ अमरावती ०९
यवतमाळ १५
नागपूर १०
चंद्रपूर ०३
गडचिरोली १५
२०१४-१५ अमरावती २१
यवतमाळ ०८
नागपूर १६
चंद्रपूर ००
गडचिरोली २२
२०१२-१३ अमरावती ०४
यवतमाळ ०८
नागपूर १०
चंद्रपूर ०३
गडचिरोली १९
२०१०-११ अमरावती ०५
यवतमाळ ०४
नागपूर ११
चंद्रपूर ०३
गडचिरोली २३
२००९-१० अमरावती ०४
यवतमाळ ०६
नागपूर १०
उत्तर चंद्रपूर ०६
दक्षिण चंद्रपूर ११