सेमाडोह येथे ढगफुटीच; एकताई रस्ताळली बंद ,घटांग काटकुंभ मार्गावर दरड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 04:39 PM2022-07-14T16:39:13+5:302022-07-14T16:42:01+5:30
उघडझाब असलेल्या पावसाने मागील पाच दिवसापासून धो धो कोसळत आपली हजेरी लावली मेळघाटच्या नदी नाल्यांना पूरस्थिती आली आहे
- नरेंद्र जावरे
चिखलदरा- मागील पाच दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मुसळधार बरसल्याचे पुढे आले आहे सेमाडो येथे १० जुलै रोजी तब्बल २६४ मिलिमीटर पाऊस कोसळल्याची नोंद निसर्गनिर्वाचन संकुलाच्या जन्मापन केंद्रावर झाल्याने जणू ढगफुटी झाली आहे, गुरुवारी सकाळी घटांग काटकुंभ मार्गावर दरड कोसळण्याचा अनेक ठिकाणी रस्त्यावर माती आली, अति दुर्गम जाणारा एकताई मार्ग बंद पडला आहे, सोळा घरांची पडझड व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अहवाल आहे.
उघडझाब असलेल्या पावसाने मागील पाच दिवसापासून धो धो कोसळत आपली हजेरी लावली मेळघाटच्या नदी नाल्यांना पूरस्थिती आली आहे. सिपना चंद्रभागा , डोलार ,खापरा खंडू ,खुर्शी, या प्रमुख नद्या पूरपातळीने वाहत आहे, तर इतरही नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला मेळघाटातील आदिवासी पाडे उंच सकल भागावर बसल्यामुळे गावात पाणी शिरत नसले तरी, ये जा करण्यासाठी असलेला वाहतुकीचा मार्ग, मातीची घरे असल्यान पाणी मुरल्यामुळे अंशतः व पूर्णता पडझड शेतीचे नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले आहे.
सोयाबीन ज्वारी चे नुकसान, १७ घराची पडझड
चिखलदरा तालुक्यातील १२४ शेतकऱ्यांचे सर्वाधिक सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असून त्या खालोखाल ज्वारी कापूस तूर मका शंभर हेक्टर पेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे महसूल व कृषी विभागाच्या वतीने प्राथमिक सर्वे करून नुकसानी संदर्भात प्रशासनाला कळविण्यात आले असून १६ अंशतः तर एका घराची पूर्णता पडझड झाली आहे.
सेमाडोह ढगफुटी आतापर्यंत ८७३ मिलीमीटर
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित परिसरात असलेल्या सेमाडोह येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. १० जुलै रोजी सर्वाधिक २६४ मिलीमीटर तर १४ जुलै रोजी १०६ मिलिमीटर पावसाची नोंद मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गनिर्वाचन संकुल येथील असलेल्या जन्म आपण केंद्रावर झाली आहे आतापर्यंत ८७३ मिलिमीटर पाऊस कोसळला असून येथून वाहणाऱ्या सिपणा नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित जंगलात सर्वाधिक पाऊस कोसळतो हे विशेष.
हिल्डा एकताई मार्ग बंद, दरड कोसळली
अति दुर्गम असलेल्या हतरु परिसरातील हिल्डा येथील चौवलादेव जवळील नदीला पूर असल्याने पुलावरन पाणी वाहत आहे परिणामी एकतरी कडे जाणारा मार्ग बंद असल्याचा अहवाल तलाठ्यांनी महसूल विभागाला दिला आहे, परतवाडा घटांग काटकुंभ या मार्गावरील कुकरू नजिकच्या बन्सी टन नामक वळणावर दरड कोसळली तर अनेक ठिकाणी माती वाहून आल्याने वाहनधारकांना गुरुवारी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला.
पावसामुळे १६ अंशतः तर एका घराचे पूर्णतः नुकसान झाले, शेतीचे नुकसान झाले असून त्या संदर्भात पंचनामे करून अशी माहिती जिल्हा स्तरावर पाठविण्यात आली आहे गजानन राजगडे, तहसीलदार चिखलदरा