जिल्ह्यात १३२ सरपंच, उपसरपंचपदांची आज निवडणूक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:14 AM2021-02-11T04:14:56+5:302021-02-11T04:14:56+5:30
अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम आटोपली. सरपंचपदाचे आरक्षणदेखील जाहीर झाले असून, आता ११ ते १८ फेब्रुवारी ...
अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम आटोपली. सरपंचपदाचे आरक्षणदेखील जाहीर झाले असून, आता ११ ते १८ फेब्रुवारी दरम्यान सरपंच, उपसरपंचपदासाठीची निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. यानुसार गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी १४ तालुक्यांतील १३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदांची निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रथम विशेष सभा घेण्यात येणार आहे. या सभांमध्ये सरपंच व उपसरपंचांची निवड केली जाईल.
मुदत संपलेल्या जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. निवडणुकांचे निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार २०२० ते २०१५ या कालावधीकरिता जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण गत आठवड्यात जाहीर करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदांच्या या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जाहीर केला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात म्हणजे ११ फेब्रुवारी रोजी १४ तालुक्यांतील १२ तालुक्यांत प्रत्येकी १०, तर धारणी तालुक्यातील ७ आणि चिखलदरा तालुक्यातील ५ अशा १३२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंचपदांसाठीच्या निवडणुकीकरिता विशेष सभा घेतली जाणार आहे. यात नवे सरपंच व उपसरपंच निवडले जाणार आहे. त्यामुळे गावोगावी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
बॉक्स
१३२ सरपंच, उपसरपंचपदांची निवडणूक गुरुवारी
जिल्ह्यातील सरपंच व उपसरपंचपदासाठी निवडणूक ११ ते १८ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणार आहे. त्यानुसार ११ व १२ फेब्रुवारीला प्रत्येकी १३३ यानंतर शनिवार रविवार सुटी आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीला १३०, मंगळवार १६ फेब्रुवारीला १००, बुधवार, १७ ला ५२ आणि १८ फेब्रुवारीला ०६ याप्रमाणे सरपंच व उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे.