डिजीटल व्हिलेज हरिसाल ग्रामपंचायतची निवडणूक

By admin | Published: February 14, 2016 12:21 AM2016-02-14T00:21:08+5:302016-02-14T00:21:08+5:30

देशातील पहिले डिजिटल व्हिलेज असणाऱ्या हरिसाल ग्रा.पं. ची रविवार १४ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे.

Election of Digital Village Harisal Gram Panchayat | डिजीटल व्हिलेज हरिसाल ग्रामपंचायतची निवडणूक

डिजीटल व्हिलेज हरिसाल ग्रामपंचायतची निवडणूक

Next

दोन रिक्त : नऊ जागांकरिता २० उमेदवार रिंगणात
धारणी : देशातील पहिले डिजिटल व्हिलेज असणाऱ्या हरिसाल ग्रा.पं. ची रविवार १४ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. एकूण ११ जागांपैकी २ जागांवर उमेदवाराच नसल्याने केवळ ९ जागेसाठी २ हजार ८१ मतदार मतदान करणार आहेत. या ९ जागांकरिता एकूण २० उमेदवार आपले भाग्य आजमावणार आहेत.
हरिसाल ग्रामपंचायतीमध्ये चित्री, बोरी व फैलढाणा या ४ गावांचा समावेश आहे. वार्ड क्रमा १ मध्ये ओबीसी व वॉर्ड क्रमांक ४ मध्ये एससी महिला उमेदवार मिळाल्याने ह्या दोन जागा रिक्त असून वॉर्ड क्रमांक १ मध्ये एस.टी. साठी मदन चिमोटे, फुलाजी कास्देकर, कृष्ण दारसिंबे, काशीराम कास्देकर तर एस.टी. महिलांमध्ये मनीषा भुसूम आपले भाग्य आजमावीत आहेत.
वॉर्ड क्रमांक २ मधील एसटीसाठी भाऊ धिकार व श्रीराम सावलकर तर एसटी महिलांसाठी गोपी धुर्वे व सेवंती जामुनकर मैदानात आहेत. वॉर्र्ड क्रमांक ३ मधील एस.टी. करिता राखीव जागेसाठी मदन चिमोटे व हरिराम सावळकर तर ओबीसीकरिता गणपत गायन व गणेश येवले तर एस.टी. महिलांसाठी मनीषा चिमोटे व शेवंती जामुनकर रिंगणात आहे. वॉर्ड क्रमांक ४ मधील ओबीसी प्रवर्गाकरिता गणपत गायन व अंकुश जोल्हे व एस.टी प्रवर्गाकरिता महिलांसाठी गोपी धुर्वे व लता कास्देकर या भाग्य आजमावित आहेत.
रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी एसडीओ कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार कृष्णा भामकर तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नीलेश राठोड, तहसीलदारर संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहत आहेत. डिजिटल व्हिलेज असलेल्या हरिसालमधील पहिली निवडणूक असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डिजिटल व्हिलेजमुळे हरिसाल या गावाला महत्त्व प्राप्त झाले आहे. याकडे शासनाचे विशेष लक्ष राहणार असून पदाधिकाऱ्यांना प्रकाशझोतात येण्याची ही संधी राहणार आहे.

Web Title: Election of Digital Village Harisal Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.