जिल्हा बँक संचालकांच्या निवडणुकीची रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:11 AM2021-07-26T04:11:41+5:302021-07-26T04:11:41+5:30
चांदूर रेल्वे तालुक्यातून ३८ मतदार चांदूर रेल्वे : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चांदूर रेल्वे तालुक्यातून एक संचालकपदाच्या ...
चांदूर रेल्वे तालुक्यातून ३८ मतदार
चांदूर रेल्वे : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चांदूर रेल्वे तालुक्यातून एक संचालकपदाच्या निवडणुकीसाठी ३८ मतदारांची यादी स्थानिक सहायक निबंधक कार्यालयाने जिल्हा निबंधक कार्यालयाला पाठवल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील प्राथमिक सेवा सहकारी सोसायटीमधून ३० प्रतिनिधी असून, इतर सहकारी संस्थांतून आठ प्रतिनिधी म्हणून मतदार यादीमध्ये समाविष्ट आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत चांदूर रेल्वे तालुक्यातून एका संचालकपदासाठी मतदान होणार आहे. ही निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे. यात मोठी आर्थिक उलाढालही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीकरिता सेवा सहकारी सोसायटीचे प्रतिनिधी निवडताना आपल्याच मताचे प्रतिनिधी होण्यासाठी कसोशीने प्रयत्न सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केले असल्याचेही ग्रामीण भागात दिसत होते.
प्राथमिक शेती पतपुरवठा संस्थेतून अजिंक्य आरेकर, सविता गावंडे, सुरेंद्र (जाधव) देशमुख, आदित्य जगताप, उमेश केने, श्रीनिवास देशमुख, संजय सु. देशमुख, पुष्पलता थेटे, वीरेंद्र जगताप, प्रतिभा वाघ, वच्छला धावडे, शैलेंद्र जाधव, वनमाला मारोटकर, श्रीकांत देशमुख, जीवन शेळके, नीलेश याऊल, बिपिन देशमुख, दयाचंद चांडक, साहेबराव कथलकर, मनकर्णा भलावी, किशोर कडू, सिंधू ठाकरे, किशोर हिंगे, सुरेश वामनराव चौधरी, सुरेश तुकाराम चौधरी, गणेशराव देशमुख, अतुल ठाकरे, शकीलखाँ शरीफखाँ, सचिन ऊर्फ शशिकांत तायवाडे, रमेश काकडे, नोकरदारांच्या पतपुरवठा संस्थेतून राहुल इमले, सचिन घारफळकर, ग्राहक भांडार सहकारी संस्थेतून गजानन हरणे, गृहनिर्माण सहकारी संस्था नागरी मधून नरेंद्र कोकाटे, लीलाबाई मुंधडा, बलुतेदार सहकारी संस्थेतून देविदास राऊत, तालुका खरेदी विक्री संघातून गोविंदराव देशमुख व सूतगिरणी कापूस उत्पादक संस्थेतून राजेंद्र अग्रवाल अशा ३८ मतदारांचा या निवडणुक चांदूर रेल्वे तालुक्यातून समावेश आहे.