निवडणूक अंतिम बातमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:19 AM2020-12-05T04:19:36+5:302020-12-05T04:19:36+5:30
३६ तास निरंतर चाललेल्या मतमोजणी प्रक्रियेत पहिल्या पसंतिक्रमाच्या आणि दुसऱ्या पसंतिक्रमाच्या मतगणना २५ फेऱ्या पार पडल्या. २७ उमेदवारांसाठी एकूण ...
३६ तास निरंतर चाललेल्या मतमोजणी प्रक्रियेत पहिल्या पसंतिक्रमाच्या आणि दुसऱ्या पसंतिक्रमाच्या मतगणना २५ फेऱ्या पार पडल्या. २७ उमेदवारांसाठी एकूण ३० हजार ९१८ मते मोजली गेली. यातील १०८९ अवैध मते वगळता २९,८२९ मते वैध ठरली. प्रथम पसंतिक्रमाच्या फेरीत १४ हजार ९१६ मतांचा ‘क्वालिफाइंग कोटा’ (विजयासाठी आवश्यक मते) २७ पैकी एकाही उमेदवाराने पूर्ण केला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतिक्रमाच्या मतांची मोजणी सुरू करण्यात आली. या प्रक्रियेत सर्वाधिक कमी मते प्राप्त केलेले उमेदवार मतगणना प्रक्रियेतून बाद केले जातात. तशा उमेदवारांच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या क्रमांकाची मते ज्या उमेदवाराच्या नावे असतील, त्या उमेदवाराच्या मतांमध्ये समाविष्ट केली जातात. या पद्धतीच्या फेरीला ‘बाद फेरी’असेही त्यामुळे संबोधतात. एकूण .......... बाद फेऱ्यांची मतगणना करण्यात आल्यावरही क्वालिफाईंग कोटा कुण्याही उमेदवाराने पूर्ण न केल्याने बाद फेरीत सर्वाधिक मताधिक्य प्राप्त झालेल्या किरण सरनाईक यांना निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह यांनी विजयी घोषित केले.