शिक्षण, बांधकाम सभापतीपदासाठी २० मार्चला निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:13 AM2021-03-14T04:13:46+5:302021-03-14T04:13:46+5:30
निवडणूक कार्यक्रमानुसार, शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येतील. सभेचे कामकाज दुपारी ३ वाजता ...
निवडणूक कार्यक्रमानुसार, शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येतील. सभेचे कामकाज दुपारी ३ वाजता सुरू होईल व सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखविणे व उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. छाननी संपल्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी १५ मिनीटांचा वेळ दिला जाईल. ही वेळ संपल्यावर उमेदवारी मागे घेतलेल्या व्यक्तींची व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे वाचून दाखविण्यात येतील. त्यानंतर आवश्यकता भासल्यास तात्काळ मतदान, मतमोजणी व इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. विशेष सभेच्या दरम्यान सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझरचा वापर व इतर दक्षतेचे पालन करणे आवश्यक असल्याचीही सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.