सहकारातील धुरिणांना निवडणुकीचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:22+5:302021-05-28T04:11:22+5:30
अंजनगाव सुर्जी: वादग्रस्ततेशी जुने नाते असलेल्या येथील बाजार समितीचे कार्यकाल संपल्यानंतर समीतीचे संचालकांना सहा महिन्यांची ...
अंजनगाव सुर्जी: वादग्रस्ततेशी जुने नाते असलेल्या येथील बाजार समितीचे कार्यकाल संपल्यानंतर समीतीचे संचालकांना सहा महिन्यांची मुदतवाढ पदरात पाडुन घेतली हाेती. परंतू जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून अंजनगाव सुर्जीचे सहायक निबंधक स्वाती गुडधे यांची प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आल्याचे आदेश केले. या आदेशाने तालुक्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असृून, या क्षेेत्रातीुल धुरीणांना आता निवडणुकीचे वेध लागले आहेत.
तक्रारीने आपले काही होत नाही, या भ्रमात असलेल्या बाजार समितीच्या संचालक मंडळाचा भ्रमाचा भाेपळा २४ मे च्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून आलेल्या आदेशाने फुटला. बाजार समितीत प्रशासकराज आले आहे. तथाकथित सहकार नेत्यांच्या गंभीर स्वरूपाच्या ठपक्याने झोपा उडाल्या आहेत. भूसंपादन सारख्या गंभीर विषयात विकासकाला लाभ पोहोचविणाच्या माध्यमातून बाजार समितीच्या संचालकांनी बाजार समिती व शेतकऱ्यांचे हित जोपासण्या ऐवजी विकसकाकडून चिरीमिरी घेत आपला आर्थिक लाभ करुण घेतला.
काय आहे आदेशात
संचालक मंडळ भुमाफीयाच्या मायाजाळात ओढल्या गेले होते. त्याच्या इशार्यावर काम करत होते. सदर प्रकरण माफिया कसे सुलभ होईल असे कार्य करीत होते. प्रशासकाने बाजार समितीचा प्रभार घेतल्यापासून सहा महिन्याचे आत बाजार समितीच्या निवडणुका घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आदेशित असल्याने या सहा महिन्यात निवडणूकीचे रणशिंग फुंकल्या जाणार हे निश्चित.
तथाकथितांना चपराक
बरखास्तचा आलेला आदेश तथाकथित शेतकरी नेते मंडळींना चपराक असल्याची प्रतिक्रिया येथे उमटली आहे. बाजार समितीचे संचालक सुधीर अढाऊ वगळता इतर संचालकांना काढून टाकण्याची माझी खात्री झाली आहे, असे वाक्य आदेशात असल्याने इतर संचालकांबाबत जिल्हा उपनिबंधकांना काय म्हणायचे आहे, ते वेगळे सांगण्याची गरज नाही.