नप निवडणुकीत भाजपात बंडाळीची शक्यता !

By admin | Published: November 2, 2016 12:27 AM2016-11-02T00:27:21+5:302016-11-02T00:27:21+5:30

नगरपरिषदेची पंचवार्षिक ची मुदत संपत असल्याने निवडणूक कार्यक्रम लवकरच लागणार आहे.

Election results in the possibility of a rebellion in the BJP! | नप निवडणुकीत भाजपात बंडाळीची शक्यता !

नप निवडणुकीत भाजपात बंडाळीची शक्यता !

Next

नगराध्यक्षपदासाठी १५ : नगरसेवकांकरिता १६४ उमेदवारी अर्ज
वरुड : नगरपरिषदेची पंचवार्षिक ची मुदत संपत असल्याने निवडणूक कार्यक्रम लवकरच लागणार आहे. २०१६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांसह काही आघाडीसुध्दा सक्रिय झाली आहे. प्रत्येकाने आपले उमेदवार उभे केले आहे. समदु:खी उमेदवारांची मनधरणी करताना राजकीय पक्षाची दमछाक होत आहे. भाजपने इच्छुकांना उमदेवारी नाकारल्याने अनेकांनी बंडखोरीकडे वाटचाल केल्याचे चित्र आहे.
अनेकांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. परंतु आता उमेदवारी अर्ज कोण माघारी घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. नगराध्यक्षपदाकरिता एकूण १५ महिला उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. १२ प्रभागांतील २४ नगरसेवक पदाकरिता १६४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. आता केवळ माघारीची वाट राजकीय पक्षांना लागली आहे.
पालिकेत २४ सदस्य असून १२ प्रभाग आहेत. निवडणूक आयोगाने दोन सदस्यीय प्रभाग रचना केल्याने ६ प्रभागांचे १२ प्रभाग झाले आहेत. नगरसेवकांची संख्या २४ झाली. शहराची सन २०११ च्या जनगणनेनुसार ४५ हजार ४८२ एवढी लोकसंख्या असून मतदारांची एकूण संख्या ३४ हजार ६०७ आहे. यामध्ये पुरुष मतदार १७ हजार ८२४ तर स्त्री मतदार १६ हजार ५८३ आहे. नगरपरिषदेवर भाजपा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आहे. वरुड विकास आघाडी विरोधात होती. वरुडचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिला राखीव असल्याने नगराध्यक्षपदाकरिता १५ नामांकन दाखल झाले आहेत. यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, वरुड विकास आघाडीसह काही अपक्षांनी नामांकन दाखल केले, तर नगरसेवक पदाकरिता २४ जागांसाठी १६४ नामांकन दाखल झाले आहेत. उमेदवारीवरुन भाजपमध्ये नाराजीचा सूर झाला आहे. यामुळे अंतर्गत बंडाळी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. यामध्ये भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तसेच विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर काळे यांच्यासह अनेकांना पक्षश्रेष्ठीने उमेदवारी नाकारल्याने काहींनी अपक्ष उमदेवारी दाखल केली आहे. नवोदित उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रमुख पक्षामध्ये नगराध्यक्षपदासाठी राकाँतून माधुरी महेंद्र देशमुख, शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष जया नेरकर, हेमलता कुबडे, काँग्रेसकडून चित्रा सागर बेलसरे, भाजपाकडून स्वाती युवराज आंडे, वरुड विकास आघाडीकडून अस्मिता उमेश यावलकर, प्रहार संघटनेकडून प्रतिभा तिवारी, विदर्भ मुक्ती संघटनेकडून ताराबाई बारस्कर सह १५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. काही पक्षामध्ये नगरसेवक पदाकरितासुध्दा उमेदवारीवरून अंतर्गत कलहाला मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे. प्रमुख पक्षांनी नवोदीतांना संधी दिल्याने जुण्याजाणत्या लोकांना उमेदवारी मिळाली नाही. नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. यावेळी एकापेक्षा एक उमदेवार निवडणूक रिंगणात राहिले तर निवडणुकीला चांगलाच रंग चढण्याची शक्यता आहे. एकमेकाविरुध्द कुरघोड्यांनासुध्दा वाव मिळणार आहे. अत्यल्प मताचा फटका पराभुतांना सहन करण्याची वेळ येऊ शकेल. भाजपचे आ. अनिल बोंडे, राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन देशमुख, काँग्रेसचे नरेंशचंद्र ठाकरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड, प्रहारचे आ.बच्चू कडू, वरुड विकास आघाडीचे उमेश यावलकर उमेदवारांच्या प्रचाराची रंगीत तालीम करून मतदारांचा आढावा घेत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Election results in the possibility of a rebellion in the BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.