पाच तालुक्यातील सरपंच, उपसरपंचांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:13 AM2021-02-12T04:13:21+5:302021-02-12T04:13:21+5:30
चांदूर बाजार तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमधील सत्तावर्तुळ पूर्ण १० पैकी ३ ग्रामपंचायत अविरोध : चांदूर बाजार : तालुक्यातील ४१ पैकी ...
चांदूर बाजार तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमधील सत्तावर्तुळ पूर्ण
१० पैकी ३ ग्रामपंचायत अविरोध :
चांदूर बाजार : तालुक्यातील ४१ पैकी १० गावांच्या गुरूवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच निवडीचा कार्यक्रम शांततेत पार पडला. जसापूर ग्रा.पं.चे सरपंचपदी वैशाली बंड, उपसरपंचपदी कांचन भोतमांगे, कुऱ्हा ग्रा.पं बिनविरोध सरपंच - अर्चना भुस्कडे, उपसरपंच : मुजोब अहमद मोबिन खान, हिरूर पूर्णा सरपंच : विजया देशमुख, उपसरपंच : सुवार्ता वानखडे, शिरजगाव कसबा सरपंच : प्रवीण खेरडे, उपसरपंच - वृषाली उमप, देऊरवाडा सरपंच : ललिता गायगोले, उपसरपंच - आरसिया अंजुम, काजळी सरपंच- बंडू कपले, उपसरपंच किशोर थोराई, माधान सरपंच- अंजली मोहोड, उपसरपंच- अभिजित जवंजाळ, सुरळी ग्रा पं बिनविरोध सरपंचपदी मोहन देशमुख, उपसरपंच शैलेश निगुर्ळे, ब्राम्हणवाडा पाठक ग्रा.पं. बिनविरोध सरपंच कविता चौधरी, उपसरपंच संदीप देशमुख, ब्राम्हणवाडा थडी सरपंच - वंदना गवई, तर उपसरपंचपदी अतुल दारोकर विराजमान झाले. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार धीरज स्थूल व नायब तहसीलदार अर्जुन वांदे यांनी ही निवड पूर्ण केली.
बॉक्स
ब्राह्मणवाड्यात एक मत अवैध
ब्राह्मणवाडा थडी : चांदूर बाजार तालुक्यातील राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी ब्राह्मणवाडा थडी येथील सतरा सदस्य ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी वंदना गवई, तर उपसरपंचपदी अतुल दारोकर यांनी ९ विरुद्ध ७ अशा फरकाने ही लढत जिंकली. तर एक मत अवैध ठरले.
---------------
फोटो पी ११ जळगाव आर्वी
धामणगावात चार महिलांची सरपंचपदी निवड
धामणगाव रेल्वे : गुरुवारी झालेल्या दहा ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत चार ठिकाणी महिला सरपंचपदी विराजमान झाल्या तर सहा जागी पुरुषांची निवड करण्यात आली. जुना धामणगाव ग्रामपंचायतीमध्ये विश्वेश्वर दिघाडे सरपंच तर उपसरपंचपदी हर्षा मनोज तायडे या विजयी झाल्या. जळगाव आर्वी मध्ये सत्यभामा कांबळे सरपंच तर उपसरपंचपदी गणेश उईके, वाघोलीमध्ये निशांत हेंडवे सरपंच, दुर्गा धुर्वे उपसरपंच, निंभोरा राज येथे सरपंचपदी उज्ज्वला यादव तर उपसरपंचपदी गौतम गजभिये, आसेगावात अविनाश मांडवगणे सरपंच तर उपसरपंच रेखा शेंडे, घुसळीत राजेंद्र बांते सरपंच तर उपसरपंचपदी सुभाष डबले, हिंगणगाव ग्रामपंचायतीमध्ये दुर्गाबक्षसिह ठाकूर यांची सरपंचपदी अविरोध, तर उपसरपंचपदी संगीता धोटे, तिवरा येथे जोत्सना निसार सरपंच तर आशिष सावळीकर उपसरपंच, अशोकनगर ग्रामपंचायतमध्ये स्नेहल कडू सरपंच तर उपसरपंचपदी ओंकार खंडारे, वडगाव राजदी सरपंचपदी समीर हांडे तर उपसरपंचपदी बाबाराव टाले यांची अविरोध निवड झाली.
बॉक्स
जळगाव आर्वीत झळकला भाजपचा झेंडा
तालुक्यातील जळगाव आर्वी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या सत्यभामा कांबळे तर उपसरपंचपदी गणेश उईके विजयी झाले. निवडणुकीनंतर येथे भाजपचा झेंडा फडकविण्यात आला. नऊ सदस्यीय असलेल्या जळगाव आर्वी ग्रामपंचायतीत रामगाव, गंगाजळी ही गावे येतात. येथे झालेल्या निवडणुकीत कल्पना गायकवाड, सुनीता नेवारे, अश्विनी वरखडे या सदस्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी माजी उपसरपंच धीरज मुडे यांची उपस्थिती होती.
----------------------
फोटो पी ११ चांदूररेल्वे
चांदूर रेल्वेत पाच महिला सरपंच
चांदूर रेल्वे : तालुक्यातील १० ग्रामपंचायतींपैकी पाच ठिकाणी महिला तर पाच ठिकाणी पुरुष सरपंचांची निवड झाली. तालुक्यातील येरड, शिरजगाव (कोरडे), टिटवा, बग्गी, बोरी, बासलापूर, मांजरखेड (दानापूर), धानोरा मोगल, चिरोडी, किरजवळा या ग्रामपंचायतीमध्ये ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता ही निवड झाली. बासलापूर येथे सरपंच सुरेंद्र पवार तर उपसरपंच मोना खडसे, चिरोडी येथे सरपंच माला चव्हाण तर उपसरपंच संदीप कुमरे, किरजवडा येथे सरपंच प्रदीप , उपसरपंच सविता मोंढे, येरड येथे सरपंच स्वप्नील प्रशांत देशमुख, उपसरपंचपदी जयश्री खंडाते, टिटवा येथे सरपंच काजल वानखडे, उपसरपंच अंकुश जवळकर, बग्गी येथे सरपंच विजया चवाडे तर उपसरपंच सोनाली दांडगे, मांजरखेड (दा) येथे सरपंच मारोती मोहोड तर उपसरपंच संतोष मुंधडा, शिरसगाव कोरडे येथे सरपंच सीमा बनसोड तर उपसरपंच संगीता राजेंद्र बद्रे, बोरी सरपंच माया मेश्राम, तर उपसरपंच शरद गुल्हाने, धानोरा मोगल येथे सरपंच अमोल लहाबर तर उपसरपंच राजेंद्र झाकर्डे यांची निवड झाली. निवडणुकीसाठी तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी, तलाठी यांनी काम पाहिले.
----------------
फोटो पी ११ खानापूर
नांदगाव तालुक्यात १० ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवड
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली होती. त्यापैकी दहा ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांची गुरूवारी निवड झाली. यात कंझरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेख फैमुन्नीसा रईस व उपसरपंचपदी सुजित मेश्राम, शिरपूर सरपंचपदी निवृत्ती केशरखाने व उपसरपंचपदी लक्ष्मी राऊत, वडूरा सरपंच महादेव ढोके व उपसरपंचपदी संतोष भोसले, पळसमंडळ येथे सरपंचपदी मंगला मोरे, उपसरपंचपदी संगीता राऊत, पिंपरी गावंडा सरपंचपदी कांता लळे, उपसरपंचपदी भूषण बोदडे, फुल आमला सरपंचपदी मीना खंडारे, उपसरपंचपदी मंदा राऊत, धामक सरपंचपदी जयदीप काकडे व उपसरपंचपदी अवधूत पाटील, खानापूर सरपंचपदी शीला बसवनाथे, उपसरपंचपदी गजानन पवार, येनस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रंजना चौधरी व उपसरपंचपदी रेखा बारसे, वाटपुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुष्पा हेरोडे, उपसरपंचपदी मुदस्सर बीन मुसा चाऊस यांची निवड झाली आहे.
--------------
अंजनगाव सुर्जी तालुक्यात सरपंच, उपसरपंचांची निवड
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील १० ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी गुरूवारी विशेष सभा घेण्यात आली. यात लाखनवाडी येथे सरपंचपदी विवेक देशमुख आणि उपसरपंचपदी वर्षा जवंजाळ यांची निवड झाली. कोतेगाव येथे सरपंचपदी वंदना उपाधे आणि उपसरपंचपदी राजेश वानखड, कोकर्डा येथे सरपंचपदी पुष्पा बारब्दे आणि उपसरपंच राजू सोळंके, खासपूर येथे सरपंचपदी गजानन सोळंके आणि उपसरपंचपदी श्रीधर साबळे, पिंपळगव्हाण येथे सरपंचपदी शिल्पा ठाकरे, उपसरपंचपदी धनराज लोणारे, कमालपूर तरोडा सरपंचपदी जया वानखडे व उपसरपंच अशोक दहिभाते, धनेगाव येथे सरपंचपदी निलू येवले, उपसरपंचपदी मुकुंद येवले, विहिगावचे सरपंचपदी जयश्री पोटदुखे तर उपसरपंचपदी भैय्यासाहेब अभ्यंकर, घोडसगावचे सरपंचपदी केशरबाई नितनवरे व उपसरपंचपदी प्रदीप गोमासे, कसबेगव्हाणचे सरपंचपदी शशिकांत मंगळे आणि उपसरपंचपदी अमोल धुरडे यांची निवड झाली.
------------