१४ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:13 AM2021-02-12T04:13:17+5:302021-02-12T04:13:17+5:30

सोमवारपासून प्रक्रिया, सहकार क्षेत्रात निवडणुकीचा ज्वर अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबलेल्या होत्या, त्या ...

The election trumpet of 14 co-operative societies sounded | १४ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

१४ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

Next

सोमवारपासून प्रक्रिया, सहकार क्षेत्रात निवडणुकीचा ज्वर

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबलेल्या होत्या, त्या टप्प्यापासून पुढे सुरू करण्याबाबत शासनाने आदेश काढला आहे. या निवडणुका चार टप्प्यात होणार आहेत. याकरिता निवडणूक प्राधिकरणाने त्याची तयारी सुरू केली आहे. सोमवार १५ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होत असून, त्यानुसार जिल्ह्यातील १४ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सहकारी संस्थांच्या चार टप्प्यांत या निवडणुका घेण्यासाठी प्राधिकरणाने जिल्हा निवडणूक आराखडा २०२० जाहीर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बॉक्स

या संस्थाच्या निवडणुका

अभिनंदन अर्बन को-ऑप बँक, पूर्णा ॲग्रो बायोएनजी सहकारी संस्था चांदूर बाजार, हरताळा सेवा सहकारी संस्था भातकुली, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक व इतर कर्मचारी पतसंस्था वरूड, नवप्रभात कर्मचारी सहकारी पतसंस्था वरूड, संत्रा बागाईतदार सहकारी समिती वरूड, अमरावती जिल्हा सहकारी बोर्ड, अमरावती जिल्हा डाकसेवक सहकारी संस्था, हरिसाल आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, दुनी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, चाकर्दा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, नांदुरी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, बिजूधावडी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था या धारणी तालुक्यातील आणि चांदूर बाजार तालुक्यातील शिवपुर सेवा सहकारी संख्या आदी १४ संस्थाच्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे.

कोट

सहकारी विभागाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील १४ सहकारी संस्थाच्या निवडणूकीची प्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून सुरू केली जाणार आहे. त्यानंतर वरिष्ठांकडून प्राप्त होणाऱ्या सूचनेप्राणे पुढील कारवाई केली जाईल.

- संदीप जाधव,

जिल्हा उपनिबंधक

अमरावती

Web Title: The election trumpet of 14 co-operative societies sounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.