ग्रामस्तरीय कृषिविकास समितीच्या निवडी रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:10 AM2021-06-11T04:10:06+5:302021-06-11T04:10:06+5:30

अमरावती : शासनाने गावपातळीवर कृषिविकासाची कामे सुलभ व्हावी, या उद्देशाने नानाजी देशमुख ग्राम कृषिविकास समिती स्थापनेचा निर्णय घेतला. ...

Elections of village level agricultural development committee stalled | ग्रामस्तरीय कृषिविकास समितीच्या निवडी रखडल्या

ग्रामस्तरीय कृषिविकास समितीच्या निवडी रखडल्या

Next

अमरावती : शासनाने गावपातळीवर कृषिविकासाची कामे सुलभ व्हावी, या उद्देशाने नानाजी देशमुख ग्राम कृषिविकास समिती स्थापनेचा निर्णय घेतला. मात्र, अनेक गावात ग्रामसभा नसल्यामुळे या समित्यांच्या निवडी रखडल्या आहेत. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना कृषिविषयक माहिती देणारा हा प्रयोग ठप्प आहे.

शासनाने प्रत्येक गावात कृषिविकास समिती स्थापनेचा आदेश गतवर्षी सप्टेंबर महिन्यात आदेश काढला होता. ग्रामीण भागातील जीवनमान प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. या व्यवसायातील अनिश्चितता दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना एकाच जागी माहिती मिळावी, हा समिती स्थापनेमागील उद्देश आहे. हवामानातील बदल आणि पर्जन्यमान, शेतीमालाच्या दरातील घसरण, नैसर्गिक साधन संपत्तीचा महत्तम विनियोग विविध योजना व प्रकल्पाची माहिती यासंदर्भात समितीचे कामकाज राहणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कृषी योजना, एकात्मिक कीड नियोजन आदी योजनांची काम समिती करणार आहे. ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढ व गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध घातले. केवळ ग्रामसभा झाली नसल्यामुळे शेतकरी हिताची कृषिविकास समिती स्थापनेचा विषय लांबणीवर पडला आहे. शासनाने घेतलेला निर्णय चांगला आहे. सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायतीने समिती स्थापन करून पूर्ण क्षमतेने कार्य करीत आपल्या कार्यक्षमतेने येणाऱ्या विविध मुद्द्यांची सक्षमपणे अंमलबजावणी केली तर उद्देश सफल झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

बॉक्स

ग्रामविकास समितीची कामे

ग्रामसेवकांनी कृषी सहायकांच्या समन्वयातून बैठक आयोजित करून कामकाज करणे आवश्यक आहे. प्रत्येक महिन्याला सहभाग घेणे आवश्यक आहे. शासकीय योजना लोकांपर्यंत पोचवणे, गावात पीक लागवड नियोजन व मार्गदर्शन करणे, कर्मचारी पर्जन्याच्या ठिकाणी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न शेतीपूरक व्यवसाय पीक काढणी तंत्रज्ञान अवगत करणे, पिकांच्या विक्रीसाठी बाजारपेठांची माहिती ठेवणे आदी कामे समितीला करावी लागणार आहे.

बॉक्स

१२ जणांचा समावेश

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मुदतीएवढीच समितीची मुदत आहे. पदसिद्ध सदस्य शिवाय इतर सदस्यांची निवड ग्रामसभेतून नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यानंतर दीड महिन्यात करणे आवश्यक आहे. समितीचे सरपंच पदसिद्ध अध्यक्ष, तर उपसरपंच पदसिद्ध सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी प्रत्येकी तीन यात एक महिला विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अध्यक्ष शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट प्रतिनिधी महिला बचत गट कृषी पूरक व्यवसायातील शेतकरी दोन तलाठी कृषी सहाय्यक सहसचिव तथा सदस्य सचिव अशा बारा जणांचा समावेश आहे.

कोट

नानाजी देशमुख ग्राम कृषिविकास समिती ग्रामसभेतून स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. परंतु कोरोनामुळे सध्या ग्रामसभा बंद आहेत. त्यामुळे मासिक सभेतून समिती स्थापनेची परवानगी द्यावी, अशी विनंती सीईओंकडे ग्रा.से.युनियनने केली होती. त्यास परवानगी मिळाली असून, येत्या काही दिवसात समिती स्थापन करून या समितीला कार्योत्तर मंजुरी पुढील ग्रामसभेत घेतली जाईल.

- कमलाकर वनवे,

जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक युनियन

Web Title: Elections of village level agricultural development committee stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.