सहकार क्षेत्रात पुन्हा लगबग, ११६ संस्थांमध्ये निवडणूक प्रक्रिया; ९ ऑक्टोबरपासून धुमशान

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 4, 2023 04:48 PM2023-10-04T16:48:47+5:302023-10-04T16:51:38+5:30

राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आदेश

Electoral process in 116 institutions, again in cooperative sector; Dhumshan from October 9 | सहकार क्षेत्रात पुन्हा लगबग, ११६ संस्थांमध्ये निवडणूक प्रक्रिया; ९ ऑक्टोबरपासून धुमशान

सहकार क्षेत्रात पुन्हा लगबग, ११६ संस्थांमध्ये निवडणूक प्रक्रिया; ९ ऑक्टोबरपासून धुमशान

googlenewsNext

अमरावती : चार महिन्याच्या पावसाळ्यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सहकार क्षेत्रातील ११६ संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. ज्या टप्प्यावर २८ जून रोजी निवडणूक प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्याच टप्प्यावरून ९ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मंगळवारी उशिरा दिले आहे.

सहकार क्षेत्रातील या सर्व संस्थांमध्ये मतदार यादीची प्रक्रिया सुरू असतानाच २८ जूनला सहकार विभागाचे आदेश धडकले होते. आता पावसाला संपल्यामुळे प्राधिकरणाचे आदेशाने पुढे ढकलण्यात आलेल्या त्या टप्प्यावरून ९ ऑक्टोबरपासून प्रक्रिया आरंभ होणार आहे.

यामध्ये अचलपूर, अमरावती, तिवसा, वरुड व मोर्शी तालुका खरेदी-विक्री संघासह ‘ब’ वर्गातील अमरावती मर्चंट को - ऑपरेटिव्ह बँक, वरूड येथील महात्मा फुले डिस्ट्रिक्ट अर्बन कॉ- ऑपरेटिव्ह बँक, येथील जिजाऊ कमर्शियल को - ऑपरेटिव्ह बँक व अन्य अशा ११६ सहकारी संस्थांमध्ये मतदार यादीची प्रक्रिया सुरु होत आहे.

Web Title: Electoral process in 116 institutions, again in cooperative sector; Dhumshan from October 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.