बडनेऱ्यात चुकीच्या मीटर रीडिंगने वीज ग्राहक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 12:50 PM2024-05-23T12:50:22+5:302024-05-23T12:50:45+5:30

Amravati : वीज ग्राहकांचे मीटर रीडिंग न घेताच बिलातून अवास्तव वसुली

Electricity consumers suffer due to wrong meter reading in Badnera | बडनेऱ्यात चुकीच्या मीटर रीडिंगने वीज ग्राहक त्रस्त

Electricity consumers suffer due to wrong meter reading in Badnera

लोकमत न्यूज नेटवर्क 
बडनेरा :
जुनी वस्ती परिसरात बऱ्याच वीज ग्राहकांचे मीटर रीडिंग न घेताच बिलातून अवास्तव वसुली केली जात असल्याची ओरड ग्राहकांमध्ये आहे. यामधून वीज ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीज बिल दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयाच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. मीटर रीडिंग योग्य घेतले जावे, अशी मागणी प्रकर्षाने पुढे आली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याची आवश्यकता आहे.

जुनी वस्ती परिसरात महावितरणच्या ग्राहकांना चुकीची वीज बिले येत असल्याची ओरड ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. महावितरणच्या मीटर रीडिंगचे कंत्राट असलेल्या एजन्सीकडून आकडे नमूद करून न घेताच चुकीचे रीडिंग वीज बिलावर टाकले जात असल्याचे वीज ग्राहकांमध्ये बोलले जात आहे. चुकीच्या रीडिंगचा फटका वीज ग्राहकांना बसत आहे. अवास्तव युनिट टाकले जात असल्याने मोठ्या रकमेची बिले ग्राहकांना येतात. त्यानंतर ग्राहकांना चुकीच्या रीडिंगमुळे वीज

बिलाच्या दुरुस्तीकरिता महावितरणच्या कार्यालयात चकरा माराव्या लागतात. बिलांच्या दुरुस्तीसाठी बराच वेळ लागतो. काही प्रसंगी ग्राहकांना बिल भरून टाका, असेदेखील सांगितले जाते. एकूणच मीटर रीडरच्या चुकीमुळे वीज ग्राहकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

ग्राहकांना त्रासदायक ठरणाऱ्या या बाबीकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे बोलले जात आहे. याबाबत संबंधित महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता, ग्राहकांकडून आलेल्या तक्रारी लगेचच आमच्याकडून मार्गी लावल्या जात असल्याचे सांगण्यात आले.
 

Web Title: Electricity consumers suffer due to wrong meter reading in Badnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.