वीज कार्यालय, शासकीय विश्रामगृह बनले दारुड्याचा अड्डा?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 04:26 PM2024-06-08T16:26:02+5:302024-06-08T16:26:55+5:30

आवारात दारूच्या बाटल्यांचा खच, कार्यालयात ओल्या पार्ध्या रंगत असल्याची चर्चा

Electricity office, government rest house turned into a drunkard's den | वीज कार्यालय, शासकीय विश्रामगृह बनले दारुड्याचा अड्डा?

Electricity office, government rest house turned into a drunkard's den?

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार :
मोर्शी रोडवरील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात परिसरात विदेशी मद्याच्या बाटल्यांचा खच आढळून आला. याशिवाय वलगाव-खरवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयालगत असलेल्या शासकीय विश्रामगृह मागील परिसरातही दारूच्या बाटल्यांचा खच आढळला. त्यामुळे ही कार्यालये दारूड्यांचा अड्डा बनत असल्याचे चित्र आहे. कार्यालयात मद्याचे शौकीन असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा वावर वाढला असल्याचेही दिसून येत आहे. 


यावर कोणाचा वचक नाही का, असा प्रश्न विचारला जात आहे. महावितरण कार्यालय हे शहरापासून काही अंतरावर असल्याने याठिकाणी जनसामान्यांचा कमी ये-जा असते. तीच परिस्थिती रोडवर वरील शासकीय विश्रामगृहाची आहे. याठिकाणी सामान्य व्यक्ती जाऊ शकत नाही, तर या दारूच्या बाटल्या कोणाच्या, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे प्रकरण उजेडात येताच कार्यालयातील व विश्रामगृहातील दारूच्या बाटल्या फेकले जाईल. मात्र, कारवाई कोणावर आणि कोण करणार, अशी चर्चा आता जनसामान्यांना सुरू आहे.


विश्रामगृहात खासगी व्यक्ती कोण?
सार्वजनिक बांधकाम उपविभागातील विश्रामगृह परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जि. प.च्या विश्रामगृहात एक बड्या अधिकाऱ्याचा राबता असतो. त्याच्यासोबत स्वतःला कार्यालय प्रमुख समजणारे खासगी व्यक्ती व ठेकेदार देखील नेहमी असतात. तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये खासगी व्यक्तींचा वावर, हे चित्र खचितच चांगले नाही. त्यामुळे या गैरप्रकाराला आळा कोण घालणार असा प्रश्न उपस्थित हो तआहे.

Web Title: Electricity office, government rest house turned into a drunkard's den

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.