करजगाव परिसरातील विजेचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:38+5:302021-06-16T04:17:38+5:30
फोटो पी १४ परतवाडा परतवाडा : अचलपूर वितरण कंपनी अंतर्गत येणाऱ्या चांदुर बाजार तालुक्यातील करजगाव व परिसरातील खेड्यांमध्ये ...
फोटो पी १४ परतवाडा
परतवाडा : अचलपूर वितरण कंपनी अंतर्गत येणाऱ्या चांदुर बाजार तालुक्यातील करजगाव व परिसरातील खेड्यांमध्ये मागील सहा महिन्यांपासून विजेचा लपंडाव नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करणारा ठरला असून बारा दिवसांत विद्युत पुरवठा पूर्ववत सुरळीत सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे
करजगाव व परिसरातील खरपी , कारंजा, सायखेड, बोदड, गोविंदपूर , अलमपूर, सर्फापूर कल्होडी
व इतर परिसरातील ग्रामीण भागात गेल्या सहा महिन्यांपासून सतत होणारा विजेचा त्रास शेतकरी, नागरिक व विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. आता तो असह्य झाला आहे. दिवसभरात सकाळपासून पंधरा ते वीस वेळा वेळा लाईट ये-जा करते. दोन तासांपर्यंत हा पुरवठा खंडित राहतो. कुठल्याच प्रकारची पूर्वसूचना किंवा विद्युत पुरवठा कशाने खंडित झाला हे वितरण कंपनीतर्फे सांगितले जात नाही. सतत सुरू असलेला हा त्रास बारा दिवसात बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सोमवारी एका निवेदनाद्वारे परिसरातील योगेश पवार, रामदास भोजने सुशांत कांडलकर दिनेश राहाटे,
सतीश गंगाखेड, पंकज आगलावे, सुशांत कविटकर, रोशन मालधुरे, नितीन कांडलकर कुलदीप हाडोळे, वैभव बेलसरे आदींनी निवेदनातून दिला आहे
===Photopath===
140621\174-img-20210614-wa0065.jpg
===Caption===
करजगाव व परिसरातील वीज पुरवठा खंडित असल्याचे अचलपूर येथील सहाय्यक कार्यकारी अभियंता बागडे यांना निवेदन देताना नागरिक