वीज ताराला स्पर्श होऊन बैल जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:55 AM2019-07-07T00:55:38+5:302019-07-07T00:56:02+5:30
शेतात पेरणी चालू असताना विजेचा शॉक लागल्याने एक बैल जागीच गतप्राण झाला. पेरणी करणारा ईसम थोडक्यात बचावले. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास लखाड येथील सुधीर निपाणे यांच्या शेतात हा अपघात घडला. ऐन पेरणीच्या हंगामात बैल दगावल्याने हरिदास ठाकरे (रा. लखाड) यांच्यावर संकट कोसळले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : शेतात पेरणी चालू असताना विजेचा शॉक लागल्याने एक बैल जागीच गतप्राण झाला. पेरणी करणारा ईसम थोडक्यात बचावले. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास लखाड येथील सुधीर निपाणे यांच्या शेतात हा अपघात घडला. ऐन पेरणीच्या हंगामात बैल दगावल्याने हरिदास ठाकरे (रा. लखाड) यांच्यावर संकट कोसळले आहे.
लखाड येथील शेतकरी सुधीर निपाणे यांच्या शेतात शनिवारी सोयाबीनचे पेरणी सुरू होती. त्यांच्या शेतातून ११ केव्हीची विद्युत लाईन पुढे गेली आहे. हरिदास तुळशीराम ठाकरे यांची बैलजोडी शेतातील विद्युत खांबाजवळून गेली असता खांबाच्या ताणासाठी असलेल्या तारांमध्ये जिवंत विजप्रवाह शिरल्याने जोडीतील एक बैल तारेच्या स्पर्शाने जागीच दगावला. हरिदास ठाकरे यांनी व्याजाने रक्कम काढून बैलजोडी विकत घेतली होती. महावितरण कंपनीने ठाकरे यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.