अकरावी प्रवेशाचा कटऑफ वाढला, दोन दिवसांत ६१९ प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:40 AM2020-12-17T04:40:30+5:302020-12-17T04:40:30+5:30
अमरावती : महानगरात इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशाची तिसरी फेरी १५ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. गत दोन दिवसांत ६१९ विद्यार्थ्यांना ...
अमरावती : महानगरात इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशाची तिसरी फेरी १५ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. गत दोन दिवसांत ६१९ विद्यार्थ्यांना पसंतीच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देण्यात आले आहे. पुढे दोन दिवस १८ डिसेंबरपर्यंत प्रवेशफेरी सुरू राहील, अशी माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे सदस्य अरविंद मंगळे यांनी दिली.
मंगळवार, बुधवार या दोन दिवसांत कला शाखा ७७, वाणिज्य ९०, विज्ञान ३०१, तर एमसीव्हीसी शाखेकरिता १५१ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहे. शुक्रवारपर्यंत तिसऱ्या प्रवेशफेरीची जागानिहाय स्थिती लक्षात येणार आहे. १९ डिसेंबर रोजी ईन हाऊस, मायनारिटी व व्यवस्थापन कोट्यातील जागा प्रत्यार्पित करण्यात येईल. तिसऱ्या फेरीत प्रवेशाचा कटऑफ वाढल्याने पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाबाबत अनिश्चितता वाढली आहे. चाैथी विशेष फेरी २० डिसेंबरनंतर प्रारंभ होईल, असे संकेत आहे. तिसऱ्या फेरीत एकूण ४,४६४ जागा प्रवेाशासाठी असून, १,५६८ जागा वाटप करण्यात आल्या आहेत.
--------------
तिसऱ्या फेरीत जागावाटपाची स्थिती
शाखा एकूण जागा प्रवेश निश्चिती
कला ९६८ २७४
वाणिज्य ७०१ २१७
विज्ञान २५५५ ९११
एमसीव्हीसी २४० १६६