राजुरा बाजार येथील महिलाचा अवैध धंद्याविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:16 AM2021-09-12T04:16:05+5:302021-09-12T04:16:05+5:30

वरूड/राजुरा बाजार : राजुरा बाजार परिसरात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून जुगार, दारूविक्री खुलेआम सुरू असल्याने महिला आणि ...

Elgar against illegal trade of women at Rajura Bazaar | राजुरा बाजार येथील महिलाचा अवैध धंद्याविरुद्ध एल्गार

राजुरा बाजार येथील महिलाचा अवैध धंद्याविरुद्ध एल्गार

Next

वरूड/राजुरा बाजार : राजुरा बाजार परिसरात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून जुगार, दारूविक्री खुलेआम सुरू असल्याने महिला आणि विद्यार्थ्यांना मद्यपी तसेच जुगारी लोकांपासून असह्य त्रास होत असल्याने येथील महिला आणि विद्यार्थिनी यांनी सरपंच, आमदारांसह पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. याशिवाय तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

राजुरा बाजार परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. शेतमजूर महिला आणि विद्यार्थी वर्गाला मद्यपी तसेच जुगारी लोकांपासून असह्य त्रास होत आहे. याबाबत अनेकवेळा ग्रामपंचायत, पोलीस स्टेशनला निवेदने दिली. परंतु, प्रशासनाने कोणतीही दाखल घेतली नाही. उलट अवैध धंदे सुरूच आहे. याला राजकीय पाठबळ मिळत असल्याने आणि पोलिसांचे अभय असल्याने राजुरा बाजार परिसरात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. याबाबत सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती, आमदार, पोलीस अधीक्षक, वरूडचे ठाणेदार यांना निवेदन देऊन तात्काळ अवैध धंदे बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. निवेदन देताना राजुरा बाजार येथील विद्या कुयटे, अर्चना निकम, प्रतिभा बहुरूपी, शीतल तळखंडे, सीमा तळखंडे, अर्चना भालेराव, रोशनी कुयटे, रेखा भालेराव, अंबिका भालेराव, रोशनी कुयटे, संगीता कुयटे, लता धामोडे, जया निकम, कविता नेरकर, उषा नेरकर, पुष्पा वाघ, कल्पना साबळे, विजया साबळे, भाग्यश्री दापूरकर, पंचफुला दापूरकर, शोभा वानखडे, शारदा वानखडेंसह शेकडो महिला उपस्थित होत्या.

Web Title: Elgar against illegal trade of women at Rajura Bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.