वडाळी देशी दारू दुकानाविरोधात पुन्हा एल्गार
By Admin | Published: May 27, 2014 11:22 PM2014-05-27T23:22:14+5:302014-05-27T23:22:14+5:30
स्थानिक वडाळी येथील देशी दारूचे दुकान त्वरीत हद्दपार करण्याची मागणी करीत या परिसरातील महिलांनी मंगळवारी पुन्हा एल्गार पुकारत तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रशासनाला
अमरावती : स्थानिक वडाळी येथील देशी दारूचे दुकान त्वरीत हद्दपार करण्याची मागणी करीत या परिसरातील महिलांनी मंगळवारी पुन्हा एल्गार पुकारत तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिल्याने देशी दारूचे दुकानाचा मुद्दा पेटण्याची शक्यता बळावली आहे. स्थानिक वडाळी येथील देशी दारूचे दुकानाविरोधात एल्गार पुकारत सदर दुकान हटविण्याबाबत वडाळी देशी दारू दुकान हटाव महिला समितीने संवैधानिक मार्गाने लढा सुरू करून मागील १६ फेब्रुवारी रोजी प्रशासनाने गुप्त मतदान प्रक्रिया राबविली. मात्र यामध्ये मोठय़ा प्रमाणात त्रुटी ठेवल्याने कायदा व सुव्यस्थेचा प्रशन निर्माण झाला होता. याबाबत महिला समितीने तक्रारही केली परंतु यावर प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. याउलट प्रामाणिकपणे लढा देणार्या महिलावर दबाब येत असल्याचे आंदोलन करणार्या महिलांनी या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने वडाळी येथील देशी दारूचे दुकान हद्दपार करावे अशी मागणी वडाळी देशी दारू दुकान हटाव महिला समितीने अप्पर जिल्हाधिकारी किशोर कामुने याच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे दरम्यान याबाबत जिल्हाधिकार्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्याना अप्पर जिल्हाधिकार्यांनी दिले. यावेळी वडाळी देशी दारू दुकान हटाव महिला समितीच्या पदाधिकारी हर्षा राऊत, अनिता वानखडे, पुष्पा गुहे, ललिता आंबेकर, निशा चव्हाण, संगीता आंबेकर, शीला गावंडे, मीना आगाशे, कल्पना वैध, फरजानाबी सैय्यद, मंगला बेनिवाल, जरीना खान, मंगला मुजाळे, कविता गंडेवार, गायत्री, सपना भगतपुरे, संजय चव्हाण तसेच अन्य महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)