कनिष्ठ स्थापत्य अभियंत्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:25 AM2021-02-21T04:25:07+5:302021-02-21T04:25:07+5:30

अमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक कनिष्ठ स्थापत्य अभियंत्यांच्या सेवेत तांत्रिक खंड पडल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. पालकमंत्री यशोमती ...

Eliminate technical volumes in the service of junior civil engineers | कनिष्ठ स्थापत्य अभियंत्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड दूर

कनिष्ठ स्थापत्य अभियंत्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड दूर

googlenewsNext

अमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक कनिष्ठ स्थापत्य अभियंत्यांच्या सेवेत तांत्रिक खंड पडल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पाठपुरावा केल्याने हा तांत्रिक खंड क्षमापित करण्याबाबत शासनाकडून निर्णय निर्गमित करण्यात आला. त्याचा लाभ या अभियंत्यांना होणार असून, विविध प्रशासकीय प्रक्रियांनाही गती मिळणार आहे.

अभियंत्यांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी लक्षात घेऊन ना. ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन दिले होते. त्यानुसार तात्काळ निर्णय निर्गमित झाला. १९९६ ते १९९८ दरम्यान नियुक्त झालेल्या कनिष्ठ अभियंत्याच्या सेवेत खंड निर्माण झाला होता. सेवा खंड क्षमापित करण्याचा कालावधी १५ दिवसांहून अधिक असू नये, अशी अट होती. त्यावेळी ८० अभियंत्यांपैकी २४ अभियंत्यांचा सेवा खंड अधीक्षक अभियंत्यांच्या स्तरावर क्षमापित होऊ शकला. २२ अभियंत्यांची सेवा निधन, राजीनामा यामुळे संपुष्टात आली. तथापि, ३४ अभियंत्यांची सेवा खंडित स्वरूपात राहिली. या अभियंत्यांच्या नियुक्ती प्रारंभी सेवायोजन कार्यालयाकडून तात्पुरत्या स्वरूपात होती. त्यानंतर निवड मंडळाकडून सहा महिन्यांची नियुक्ती करून काही काळ खंड ठेवण्यात आला व पुन्हा नियुक्ती देण्यात आली.

बॉक्स

प्रशासकीय प्रक्रियेमुळे खोळंबा

प्रशासकीय प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण न झाल्याने व निवडणूक आचारसंहिता असल्याने तांत्रिक खंड १५ दिवसांपेक्षा जास्त झाला होता. याच प्रकारच्या काही अभियंत्यांचा सेवा खंड क्षमापित करण्यात आला होता. त्यामुळे या अभियंत्यांच्या सेवेतील त्रुटी दूर करण्याची मागणी करण्यात आली होती. ती पूर्ण झाली आहे व मूळ नियुक्तीनुसार या सर्वांची सेवा नियमित झाली आहे.

Web Title: Eliminate technical volumes in the service of junior civil engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.