हिवरखेड येथील पाणीपुरवठा देयकात अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:13 AM2021-02-15T04:13:17+5:302021-02-15T04:13:17+5:30
पान ३ मोर्शी : तालुक्यातील हिवरखेड ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी तथा वसुली कारकुनाने बनावट देयके छापून करवसुली करून भ्रष्टाचार केला ...
पान ३
मोर्शी : तालुक्यातील हिवरखेड ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी तथा वसुली कारकुनाने बनावट देयके छापून करवसुली करून भ्रष्टाचार केला आहे. याबाबत तीन दिवसांच्या आत खुलासा सादर करण्यात यावा, अन्यथा चौकशीअंती आपल्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस ग्रामविकास अधिकारी संजय दोड यांनी दिले.
तक्रारीनुसार, हिवरखेड येथील पाणीपुरवठा कर्मचारी व वसुली कारकून दिवाकर फुले हे कर वसुलीची रक्कम वेळेवर भरणा करीत नाहीत. ३० जून २०२० रोजी रजिस्टरची पाहणी केली असता, पाणीपुरवठा कर वसुलीच्या १८ पावती पुस्तकांपैकी त्यांच्याकडे केवळ दोन पुस्तके देण्यात येऊन १६ पुस्तके कोरे ठेवण्यात आली. १ एप्रिल २०२० रोजी वसुली कारकुनांकडे दोन पुस्तके देण्यात आली होती. परंतु, त्या दोन्ही पुस्तकांमध्ये खोडतोड केल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतीने १ एप्रिल २०२० रोजी पावती पुस्तक दिले असताना, त्यामध्ये ६ ऑक्टोबर २०२० पासून पावत्या फाडल्याचे दिसत आहे. या पावती पुस्तकांमधून फाडण्यात आलेल्या पावत्याची तारीख व प्रत्यक्ष नळधारकास दिलेल्या पावत्यांची तारीख यात तफावत आहे. असा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर ग्रामविकास अधिका०यांनी पाणीपुरवठा कर वसुली लिपिकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
-------------