स्वाईन फ्लूूच्या संशयीत रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष

By admin | Published: September 10, 2015 12:13 AM2015-09-10T00:13:43+5:302015-09-10T00:13:43+5:30

तालुक्यात स्वाईन फ्लूने एका इसमाचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Emergency room for suspected swine flu patients | स्वाईन फ्लूूच्या संशयीत रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष

स्वाईन फ्लूूच्या संशयीत रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष

Next

वरूडमध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वरुड : तालुक्यात स्वाईन फ्लूने एका इसमाचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी तालुका आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. ग्रामीण रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूच्या संशयीत रुग्णांसाठी विशेष विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. साथीच्या आजारावरील उपचारासाठी सुध्दा तालुक्यात आरोग्य पथक सज्ज आहे. २४ तास उपचार सेवा सुरु करण्यात आल्याने कोणत्याही प्रकारचा ताप आल्यास रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार यांनी केले आहे.
तालुक्यात तापाच्या साथीने डोके वर काढले आहे. तीन वर्षांपूर्वी तालुक्यात स्वाईन फ्लूची साथ आली होती. त्याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना? अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. सद्यस्थितीत शेकडो रुग्ण तापाने फणफणत आहेत.
सुश्रुषा, देखरेखीसाठी कर्मचारी सज्ज
स्वाईन फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु त्यांनी कोणत्याही तापाला घाबरुन जाऊ नये. ताप आल्यास तातडीने ग्रामीण रुग्णालयात संपर्कसाधून तपासणी करावी. स्वाईन फ्लूचा संशयीत आढळल्यास त्याच्या उपचारासाठी विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. ‘ब’ वर्गात असलेल्या रुग्णांना टॅमी फ्लू गोळयांची मात्रा देऊन ४८ तास या वार्डात देखरेखीत ठेवण्यात येते. ४८ तासानंतर स्वाईन फ्लू जंतुंचे निर्जंतुकीकरण करुन आंतररुग्ण विभागात हलविण्यात येते. यामुळे इतरांना या आजाराची लागण होत नाही, असेही वैद्यकीय अधीक्षक पोतदार यांनी सांगितले.

Web Title: Emergency room for suspected swine flu patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.