आपत्कालीन सेवा बनली किरकोळ जखमींना वरदान

By admin | Published: August 31, 2015 12:09 AM2015-08-31T00:09:39+5:302015-08-31T00:09:39+5:30

गोरगरीब जनतेला आपत्कालीन स्थितीत आरोग्यसेवा देणारी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका किरकोळ जखमी व सर्वसाधारण आजारी रुग्णांसाठी वरदान ठरली आहे.

Emergency service became a boon to the minor wounded | आपत्कालीन सेवा बनली किरकोळ जखमींना वरदान

आपत्कालीन सेवा बनली किरकोळ जखमींना वरदान

Next

शासकीय निधीचा दुरुपयोग : इर्विनमधील रुग्णांच्या संख्येत वाढ
अमरावती : गोरगरीब जनतेला आपत्कालीन स्थितीत आरोग्यसेवा देणारी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका किरकोळ जखमी व सर्वसाधारण आजारी रुग्णांसाठी वरदान ठरली आहे. त्यामुळे शासकीय निधीचा दुरुपयोग केला जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे. दररोज सर्वसाधारण रुग्णांना इर्विनमध्ये दाखल केले जात असल्यामुळे दिवसेंदिवस इर्विनमध्येही रुग्णांची संख्या वाढतच आहे. मात्र, याकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे.
जनतेला तत्काळ आरोग्यसेवा देण्यासाठी शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सर्व शासकीय रुग्णालयांना उपलब्ध करून दिल्या आहेत. सुरुवातीला केवळ आपत्कालीन स्थितीतील रुग्णांसाठी रुग्णवाहिकेचा उपयोग केला जात होता. मात्र, आता सर्रारपणे किरकोळ जखमी अथवा सर्वसामान्य आजार असणाऱ्या रुग्णांनाही रुग्णवाहिका ने-आण करीत असल्याचे आढळून येत आहे. जिल्ह्यात कुठेही अपघात झाल्यास बहुतांश नागरिक १०८ क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिका बोलावितात, तो रुग्ण किरकोळ जखमी असल्यास त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रावर न नेता थेट इर्विन रुग्णालयात आणले जात आहे. किरकोळ जखमी व अथवा आजारी रुग्णांचा प्राथमिक उपचार या केंद्रावर केला जावू शकतो. मात्र, तसे न होता थेट रुग्णांना इर्विनमध्ये दाखल केले जात आहे. त्यातच मद्यपी यथेच्च दारू ढोसून मार्गालगत किरकोळ जखमी अवस्थेत पडले असल्यास त्यांनीही रुग्णवाहिका आरोग्यसेवा देत असल्याचे अनेक प्रकार उघड झाले आहे. दररोज जिल्ह्यात १० ते १५ रुग्ण १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने इर्विन रुग्णालयात आणले जात आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ५ ते ६ रुग्णच आपत्कालीन स्थितीतून आणले जात असून अन्य रुग्ण किरकोळ स्थितीत असतानाही त्यांना रुग्णवाहिकेची सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे सद्यस्थिथीत बहुतांश नागरिक साधारण रुग्णांसाठीही १०८ क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिका बोलावून घेत आहेत. इर्विनमधील रुग्णवाढीला १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका कारणीभूत ठरत असल्याची ओरड वैद्यकीय अधिकारी करीत असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे. याकडे इर्विन प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे आहे.
शासकीय रुग्णवाहिका दलालांच्या कचाट्यात
गरजंूना तत्काळ आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने के्रंद शासनाने महाराष्ट्रातील काही शहरांत १०८ क्रमांकाची सुविधा दिली. नि:शुल्क सेवा देणारी ही रुग्णवाहिका सद्यस्थितीत दलालाच्या कचाट्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. इर्विनमधून गंभीर रुग्णांना जिल्हाबाहेरील रुग्णालयात पाठविण्याचे सांगण्यात येते. अशावेळी रुग्णांचे नातेवाईक खासगी रुग्णवाहिकेची मदत घेण्यासाठी जातात. मात्र, खासगी रुग्णवाहिकेचे भाडे परवडणारे नसते. अशावेळी दलाल रुग्णांच्या नातेवाईकांना गाठून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे सांगतात.

Web Title: Emergency service became a boon to the minor wounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.