‘लम्पी’च्या उपचाराऐवजी मेळघाटात अंधश्रद्धेचा बाजार; गावदेवाजवळ नारळ, लिंबू आणि नवस कबूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 02:49 PM2022-09-16T14:49:01+5:302022-09-16T14:54:36+5:30

लसीचा तुटवडा पाहता, पाहिजे त्या प्रमाणात अजूनही लसीकरण सुरू झाले नाही.

Emphasis on superstitions in Melghat instead of treating animals suffering from 'Lumpy' virus | ‘लम्पी’च्या उपचाराऐवजी मेळघाटात अंधश्रद्धेचा बाजार; गावदेवाजवळ नारळ, लिंबू आणि नवस कबूल

‘लम्पी’च्या उपचाराऐवजी मेळघाटात अंधश्रद्धेचा बाजार; गावदेवाजवळ नारळ, लिंबू आणि नवस कबूल

Next

नरेंद्र जावरे

चिखलदरा (अमरावती) : गुरांवर आलेल्या ‘लम्पी’ या आजारासाठी मेळघाटातील आदिवासी बांधव थेट गावदेव असलेल्या मुठादेवाला साकडे घालत आहे. काहींनी नवस कबूल केल्याचे चित्र गुरुवारी तालुक्यातील चिखली या गावात पाहायला मिळाले. त्यामुळे आदिवासींची प्रत्येक सुखदुःखात असलेली अंधश्रद्धा पुन्हा एकदा पुढे आली आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातील आदिवासी पाड्यांमध्ये गुरांवर मोठ्या प्रमाणात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुपालक असलेले गोरगरीब आदिवासी शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर दुसरीकडे हा आजार रानगवा या गायवर्गीय प्राण्यांसह इतरही प्राण्यांवर पसरू नये, यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रातील गावांमध्ये जनजागृती व लसीकरणाची माहिती दिली जात आहे. तथापि, पशुवैद्यकीय विभाग पाहिजे त्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्यामुळे थिटा पडला आहे.

पाच किलोमीटरची सीमा सील

‘लम्पी’ आजाराची लागण झालेल्या आदिवासी पाड्यातील पाच किमी अंतरावरच असलेल्या गावात उपाययोजना व तातडीने लसीकरण करण्याची गरज आहे. परंतु, मेळघाटातील आदिवासी पाडे जंगल सीमारेषेवर असल्याने पशू विभाग व व्याघ्र प्रकल्पाला तारेवरची कसरत करून वन्यजिवांना वाचवण्याची गरज आहे. लसीचा तुटवडा पाहता, पाहिजे त्या प्रमाणात अजूनही लसीकरण सुरू झाले नाही.

‘भगवान भरोसे हमारे जानवर’

मेळघाटातील आदिवासींमध्ये सुखात आणि दुःखात पारंपरिक पूजा असली तरी ती अंधश्रद्धा असल्याने आजारांवरही गावदेवाची पूजा सुरू झाली आहे. चिखली गावातसुद्धा गुरुवारी सकाळी पूजापाठ करण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्याच वेळी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी लसीकरणासाठी पोहोचले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद वानखडे यांनी सांगितले.

गुरे पाणी पीत नाहीत, चारा खात नाहीत. हा रोग बरा व्हावा, यासाठी गावदेव असलेल्या मुठादेवाजवळ आम्ही आदिवासींनी पूजाअर्चा केली. नवस कबूल केला व प्रार्थना केली.

- अभिराम भारवे, शेतकरी, चिखली.

Web Title: Emphasis on superstitions in Melghat instead of treating animals suffering from 'Lumpy' virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.