अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्या
By admin | Published: June 15, 2015 12:20 AM2015-06-15T00:20:47+5:302015-06-15T00:20:47+5:30
राज्यातील १८ जानेवारी २००० पर्यंतच्या नोंदणीकृत ४,२१२ पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना विनाअट शासकीय सेवेत थेट नियुक्ती ...
मागणी : पदवीधर कर्मचाऱ्यांना शेवटची संधी द्यावी
अमरावती : राज्यातील १८ जानेवारी २००० पर्यंतच्या नोंदणीकृत ४,२१२ पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना विनाअट शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील अंशकालीन कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद विश्रामगृहासमोर आंदोलन छेडले.
यावेळी सुरेखा ठाकरे, गीता खोपडे, ज्योती वानखडे, नरेंद्र करबरेकर, रमेश माकोडे, प्रमोद बोबडे, दिलीप कोचलवार, प्रमोद टाले, मोहन काटोले, जयंत नांदूरकर, सुखदेव कांबळे, वंदना बुराने, विनोद पारखंडे, अजय इंगोले, गजेंद्र सहारे, राजकुमार दहातोंडे, मीना शिरभाते, जगदीश काळे, संजय तायडे, दिलीप लाकडे, संतोष तळणे, सुदाम तराळकर, किशोर बोबडे आदी उपस्थित होते.
पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या वयाची ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु त्यांचे वय २० आॅक्टोबर २००९ पासूनच्या शासन निर्णयाच्या तारखेपासून ग्राह्य धरण्यात यावे. पाच वर्षांपासून नोकरभरती बंद असल्याने या कर्मचाऱ्यांचे वय वाढले आहे.
यासाठी शासनच जबाबदार असल्याने येणाऱ्या नोकरभरतीमध्ये पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शेवटची संधी देण्यात यावी, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची जिल्हानिहाय ४२१२ ज्येष्ठता यादीनुसार नियुक्ती करण्यात यावी, उर्वरित पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना (परीक्षा प्रक्रिया वगळून) दुसऱ्या टप्प्यात थेट शासनसेवेत सामावून घेण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
मागील काही वर्षांपासून अविरतपणे सेवा देत असताना नियुक्ती मिळत नसल्याने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)