रेल्वे सुरक्षेसाठी कर्मचारी संघटना सरसावल्यात
By admin | Published: February 13, 2017 12:10 AM2017-02-13T00:10:00+5:302017-02-13T00:10:00+5:30
रेल्वे गाड्यांचे होणारे अपघात, प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपसात संवाद, परिसंवादाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
संवाद, परिसंवाद : नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचा पुढाकार
अमरावती : रेल्वे गाड्यांचे होणारे अपघात, प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपसात संवाद, परिसंवादाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने पुढाकार घेतला असून रेल्वेची प्रगती, सुरक्षेची शपथ घेतली जाणार आहे.
रेल्वेचे देशभरात जाळे पसरले आहे. रेल्वेची देखभाल करताना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. साधन सामग्रीचा अभाव, अत्याधुनिकरण, आधुनिक सुविधा आदी बाबींवर भर दिल्या जात नाही. त्यामुळे सुरक्षा नियमांसोबत तडजोड केली जाते. रेल्वे अपघात रोखण्यासाठी याकडे व्यापकतेची गरज निर्माण झाल्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार बनविण्यात आलेल्या टॉक्स फोर्सने दिलेल्या शिफारसीनुसार रेल्वे कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या रेटल्या आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामासंदर्भात प्रामाणिकतेवर शंका नाही, हा देखील यानिमित्ताने प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे गाड्यांचे झालेले अपघात आणि ते रोखण्यासाठी झालेले प्रयत्न खरेच कौतुकास्पद असल्याची बाब मध्य रेल्वे मुं्बई विभागाच्या प्रबंधकांनी स्पष्ट केली आहे. मात्र नॅशनल रेल्वे मजदूर युनियन संघटनेने रेल्वे सुरक्षेसाठी परिसंवाद आयोजनावर भर दिला आहे.
मध्य रेल्वे भुसावळ विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मनात न्युनगंडाची भावना निर्माण होऊ नये, याकडे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने लक्ष वेधले आहे.
रेल्वे अपघात आणि सुरक्षा यावर कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शन जाणार आहे. अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांना रेल्वे अपघात रोखणेबाबत सुरक्षा, मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)