संपकाळात कर्तव्यावरील कर्मचाऱ्याचे कापले केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 11:08 PM2018-08-08T23:08:38+5:302018-08-08T23:08:56+5:30

संप कालावधीत एका शासकीय संस्थेचा कर्मचारी कार्यालयीन काम करीत असल्याचे आढळून आल्याने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्याचे केस कापल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या कर्मचाºयाला चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या महिला कर्मचाऱ्यांनी बांगड्यांचा अहेर दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Employee's Case Cut Off | संपकाळात कर्तव्यावरील कर्मचाऱ्याचे कापले केस

संपकाळात कर्तव्यावरील कर्मचाऱ्याचे कापले केस

Next
ठळक मुद्देराज्य सरकारी कर्मचारी संघटना आक्रमक : महिला पदाधिकाऱ्यांनी दिला बांगड्याचा अहेर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संप कालावधीत एका शासकीय संस्थेचा कर्मचारी कार्यालयीन काम करीत असल्याचे आढळून आल्याने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्याचे केस कापल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या कर्मचाºयाला चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या महिला कर्मचाऱ्यांनी बांगड्यांचा अहेर दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
संप कालावधीत कार्यालयात एका शासकीय संस्थेत कर्मचारी काम करीत असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यास मिळताच त्या संघटनच्या पदाधिकाऱ्यांसह नामदेव गडलिंग यांनी त्या कर्मचाऱ्याचे केस कापले. त्याचेसोबत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष एच.बी.घोम, सरचिटणीस डी.एस.पवार, एस.डी.कपाळे, एस.ड़ब्ल्यू. शिर्के, श्रीकृष्ण तायडे, वर्षा पागोटे, अशोक हजारे होते. यावेळी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्ष कांताताई बितरे यांनी बांगड्याचा अहेर त्या कर्मचाऱ्याला केला. चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जोशी, सचिव महेंद्र हरताळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेद्वारा तीन दिवसीय संपाचे हत्यार उपसले. मंगळवारी पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्र्यालयात शुकशुकाट होता. प्रत्येक विभागातील संबधीत कर्मचाऱ्यांद्वारा कार्यालयासमोर ठिय्या देण्यात आल्याने शासकीय सेवा प्रभावित झाल्याचे दिसून आले. या संपामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसह निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सर्व कर्मचारी सहभागी झालेले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे कर्मचारी दुसऱ्या दिवशी संपात सहभागी नव्हते. मात्र, शिक्षक व ग्रामसेवक संघटना संपात सहभागी होत्या.
दुसऱ्या दिवशीही संपाची दाहकता कायम
चांदूरबाजार : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्याचा शासकीय कामकाजाला तालुक्यात चांगलाच दणका बसला आहे. मंगळवारी सुरू झालेल्या संपात काही कर्मचारी सहभागी होऊ शकले नव्हते. त्यापैकी अनेक जण दुसºया दिवशीही संपात सहभागी झाले.
दर्यापुरात पं.स., महसूल संघटनेचा संपात सहभाग
दर्यापूर : वेतन आयोगाच्या आश्वासनानुसार तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समिती कर्मचारी व महसूल संघटनेने तहसीलदार अमोल कुंभार यांना निवेदन दिले. आवाहनानुसार मंगळवारी सर्वच कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कामकाजावर परिणाम झाला.
सेतू केंद्रातील कामे खोळंबली
जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रा आदींसाठी विद्यार्थी व पालकांना नाहक त्रास झाला. कार्यालयात अधिकारी उपस्थित होते. मात्र, प्रकरणाचे प्रस्ताव करणारे कर्मचारीच संपावर असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. अधिकाऱ्यांनी फायली स्वत: तपासून स्वाक्षरी केल्याने मागील आठवड्यातील प्रकरणांची प्रमाणपत्रेच मिळू शकली.

Web Title: Employee's Case Cut Off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.