कर्मचारीच निघाले धान्यचोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 11:08 PM2017-08-19T23:08:31+5:302017-08-19T23:09:30+5:30

अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेले रोजंदारी कर्मचारीच अडत्या, व्यापाºयांचे धान्य चोरून नेताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने एकच खळबळ उडाली.

Employees left behind | कर्मचारीच निघाले धान्यचोर

कर्मचारीच निघाले धान्यचोर

Next
ठळक मुद्देसीसीटीव्हीमध्ये कैद : पोलिसात तक्रार, घटनांचा होणार उलगडा

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेले रोजंदारी कर्मचारीच अडत्या, व्यापाºयांचे धान्य चोरून नेताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने एकच खळबळ उडाली. याची तक्रार शनिवारी पोलिसात केल्याने आतापर्यंतच्या चोरीच्या घटनांचा खुलासा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील काळे आणि वाटाणे ट्रेडींग कंपनी आहे.
मध्यरात्री नेले पोते
यामधून १३ आॅगस्ट रोजी तुरीचे ५० किलोचे पोते (कट्टा) रात्री एक वाजता चोरून नेत असताना बाजार समितीचा रोजंदारी कर्मचारी रोशन गुरमाळे सीसीटीव्हीत कैद झाला. त्याच्यासोबत आणखी दोघे एका पांढºया रंगाच्या इंडीकामध्ये आल्याचे स्पष्ट दिसत आहे. रोशन गुरमाळे हा बाजार समितीमध्ये मागील पाच वर्षांपासून रोजंदारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. काळे आणि वाटाने यांच्या ट्रेडींग कंपनीमध्ये गजानन वाटाने या शेतकºयाने तूर विक्रीसाठी आणली होती. मात्र दुसºया दिवशी प्लास्टीक पोत्यामधील ५० किलोचे एक कट्टे चोरीला गेले होते.
अनेक चोºया, पोलिसात तक्रार
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसात चोरीच्या घटना घडल्या. शेतकरी, व्यापारी व अडत्यांच्या धान्याची रात्री चोरी केल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. याच कर्मचाºयाने एका संचालकाविरूद्ध घरगुती कामे करण्यासाठी दबाव आणीत असल्याची तक्रार दिली होती. बाजार समितीमध्ये आरोपींनी किती धान्य चोरले हे उघड होईल. विशेष म्हणजे यात मोठे रॅके ट असण्याची शक्यता आहे.

काळे आणि वाटाणे यांच्या सीसीटीव्ही कॅमेरात तूर पोते चोरताना रोजंदारी कर्मचारी असल्याची तक्रार मिळाली. त्यावरून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
- मंगेश भेटाळू, सचिव, कृउबा समिती, अचलपूर

Web Title: Employees left behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.