रोजगार हमी मजुरांची पायपीट; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:13 AM2021-09-27T04:13:22+5:302021-09-27T04:13:22+5:30
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून तालुक्यातील सर्फापूर ते बहिरम या रस्त्यावर वृक्षलागवड करण्यात आली. या वृक्षलागवडीवर रतनपूर सायखेडा येथील ...
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून तालुक्यातील सर्फापूर ते बहिरम या रस्त्यावर वृक्षलागवड करण्यात आली. या वृक्षलागवडीवर रतनपूर सायखेडा येथील १८ मजुरांनी ४ जून ते ७ ऑगस्ट असे दोन महिने काम केले. मात्र, त्यांना आतापर्यंत केवळ दोन मस्टरचे पैसे मिळाले आहेत. याबाबत रतनपूर सायखेडा येथील मजुरांनी स्थानिक गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनातून माहिती दिली. संबंधित कामावरील रोजगार सेवकाला वारंवार विनंती करूनसुद्धा मस्टर वेळेवर निघत नाही. काम सुरू असताना रोजगार सेवक कामावर हजर राहत नाही. मजुरांची हजेरीसुद्धा घेत नसल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. यामुळे प्रकरणाची चौकशी करून आम्हाला कामाचा मोबदला द्यावा, अशी मागणी मजुरांनी केली आहे.
निवेदन देताना गुणवंत कोकणे, धनराज राऊत, रामदास कनाटे, शैलेश चक्रे, जीवन जवंजाळ, मोहन तंतरपाळे, आकाश लोखंडे, अतुल मनोहरे, अजय दखणे, सुरेश तंतरपाळे, राजेंद्र भोरखडे, उमेश चडोकार, जय ढोबळे, सिद्धार्थ जवंजाळ, नीलेश जवंजाळ, रणजित जवंजाळ, शरद जवंजाळ, गजानन लोखंडे आदी उपस्थित होते.