महाराजस्व अभियानाचा शेतकऱ्यांना दिलासा

By admin | Published: January 20, 2016 12:34 AM2016-01-20T00:34:42+5:302016-01-20T00:34:42+5:30

शेतकरी व सर्वसामान्य माणसांचे एकाच वेळी शासकीय कामे व्हावीत यासाठी शासनाने सुरू केलेल्या महाराजस्व अभियानात तब्बल ३ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे़

Empowerment of the Maharajasis campaign | महाराजस्व अभियानाचा शेतकऱ्यांना दिलासा

महाराजस्व अभियानाचा शेतकऱ्यांना दिलासा

Next

पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ : एकाच दिवशी शेतकऱ्यांना दाखल्यांचे वितरण
धामणगाव रेल्वे : शेतकरी व सर्वसामान्य माणसांचे एकाच वेळी शासकीय कामे व्हावीत यासाठी शासनाने सुरू केलेल्या महाराजस्व अभियानात तब्बल ३ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे़
तालुक्यातील तळेगाव दशासर येथील यात्रा महोत्सवात महाराजस्व अभियानाचे उदघाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते झाले़ यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ़विरेंद्र जगताप जिल्हाधिकारी किरण गित्ते, जि़प़ अध्यक्ष सतीश उईके, पं़स़ सभापती गणेश राजनकर, उपसभापती अतुल देशमुख, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, तहसीलदार श्रीकांत घुगे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, जि़प़ सदस्य मोहन घुसळीकर, प़ंस़ सदस्य वनिता राऊत, सचिन पाटील, प्रीती ढोबळे, संगीता निमकर यांची उपस्थिती होती़
येथील आयोजित शिबिरात ३ हजार २२६ प्रकारचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले तर कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत नऊ लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले़ मृतकांचे वारसांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्र्गत सात लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रूपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले़
सेंट्रल बँक आॅफ इंडियातर्फे विविध योजनेंतर्गत १० लाभार्थ्यांना मुद्रा लोन, बचत गट, गारमेंडस, जिल्हा उद्योग अंतर्गत योजनेचे धनादेश देण्यात आले आहे़ वनविभागाच्या वतीने वन्य प्राणी पीक नुकसान भरपाईचे धनादेश देण्यात आले आहे़ तसेच कृषी विस्तार अधिकारी बंडू घुगे यांच्या पुढाकाराने विषेश घटक योजनेंंतर्गत तब्बल सोळा शेतकऱ्यांना पंचायत समिती मार्फत बैल जोडी अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे़ दुय्यम निबंधक सहकार विभागाच्या सहायक निंबंधक स्वाती गुडधे व ज्योती मलीये यांच्या सहकार्यांने पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी ११ शेतकऱ्यांना सावकारी कर्ज मुक्ती प्रमाणपत्र दिले़
तालुक्यातील धडक सिंचन विहीर योजने अंतर्गत विद्युत विभागाच्या वतीन १० शेतकऱ्यांना विज जोडणीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले तर जात प्रमाणपत्र चे वाटप पालकमंत्री प्रवीण पोटे, आ़ वीरेन्द्र जगताप, जिल्हाधिकारी किरण गीत्ते, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे यांच्या हस्ते देण्यात आले़ यावेळी तहसीलदार श्रीकांत घुगे नायब तहसीलदार के़जी़ सूर्यवंशी, देवीदास उगले, सुरेश तळोकार सावंत, विजय मसने, बावने, तलाठी प्रफुल गेडाम, वानखडे, प्रशांत जायदे, जऱ्हाड, डि़ एऩ चिखलकर, कीर्ती आडे, सारिका गुल्हाने, सतीश कापडे, भाकरे, विश्वेश्वर सोलनकर, रवी पवार, राजनकर यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Empowerment of the Maharajasis campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.