अतिक्रमण करा, पण समानता ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:10 AM2021-01-09T04:10:26+5:302021-01-09T04:10:26+5:30

फोटो जे-८-प्रेस मुन्ना अमरावती : शहरातील वाढत्या अतिक्रमणाची समस्या निकाली काढण्याकरिता महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करीत आहे. मात्र, सामान्यांना ...

Encroach, but keep the similarities | अतिक्रमण करा, पण समानता ठेवा

अतिक्रमण करा, पण समानता ठेवा

googlenewsNext

फोटो जे-८-प्रेस मुन्ना

अमरावती : शहरातील वाढत्या अतिक्रमणाची समस्या निकाली काढण्याकरिता महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करीत आहे. मात्र, सामान्यांना भुर्दंड व श्रीमंतांना अभय असा दुजाभाव करीत असल्याचे ताशेरे ओढले. त्यामुळे नियोजित व समान तत्त्वावर अतिक्रमण कारवाई करावी, असे माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेच्या माध्यमातून सुचविले.

कोरोना काळात अनेकांचा रोजगार महापालिका दररोज शहरातील कुठल्या ना कुठल्या भागात अतिक्रमणाची कारवाई करीत आहे. अनेकांची व्यवसायाचे साहित्यदेखील उचलून आणत आहेत. त्यामुळे हातगाडीवर दिवसभर राबून कमावलेल्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या सामान्य व्यक्तीला भुर्दंड देऊन ते सोडूनही देत आहेत. मात्र, राजकीयदृष्ट्या प्रबळ असलेल्या बड्या व्यक्तींना या कारवाईतून सवलत मिळत असल्याचे प्रकर्षाने जावणवत आहे. एका भागात कारवाई केल्यानंतर काही दिवसांत अतिक्रमण जैसे थे होत असल्याने नियोजनाचा अभाव यातून दिसून येत आहे. हा सामान्य नागरिकांवर अन्याय असून तो दूर करण्याकरिता सोमवारी दुपारी १२ वाजता महापालिका आयुक्त कार्यालयासमोर प्रतिकात्मक वरली मटका तथा अवैध दारू विक्री करण्यात येईल, असे ते म्हणाले. यावेळी युवक काँग्रेसचे सागर देशमुख, समीर जवंजाळ, रवि वानखडे, चंदन यादव, योगेश भाकरे, जितेंद्र भैसे, अनिल हिवरेकर, गजेंद्र ति़डके उपस्थित होते.

Web Title: Encroach, but keep the similarities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.