बडनेरा मार्गावरील अतिक्रमण हटविले
By Admin | Published: January 13, 2016 12:09 AM2016-01-13T00:09:05+5:302016-01-13T00:09:05+5:30
महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी सकाळी ११ वाजता लोकशाही दिनातील प्रकरण निकाली काढले.
महापालिकेची कार्यवाही : एक ट्रक साहित्य जप्त
अमरावती : महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी सकाळी ११ वाजता लोकशाही दिनातील प्रकरण निकाली काढले. सदर कार्यवाही बेनाम चौक ते डी-मार्ट राष्ट्रीय महामार्गावरील हॉकर्स तसेच तखतमल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, महेश भवनजवळ बडनेरा रोड येथील रस्त्यावरील हॉकर्स स्टॉल, तसेच नास्त्याच्या गाड्या हटविण्यात आले.
सदर कार्यवाहीमध्ये १ ट्रक सामान जप्ती करण्यात आले. सदर अतिक्रमण कार्यवाहीमध्ये अतिक्रमण पथक प्रमुख जी.के. कुत्तरमारे, उमेश सवाई (निरीक्षक) तसेच मनपा पोलीस पथक ए.पी.आय. खराटे व अतिक्रमण कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी भारत बघेल, अमोल पान्हेकर, किशोर कनोजे, देशमुख व इतर पोलीस कर्मचारी हजर होते. अतिक्रमण हटविल्याने हा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)