अंजनसिंगी येथील ई क्लास जागेवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:12 AM2021-02-07T04:12:47+5:302021-02-07T04:12:47+5:30
पान ३ साठी अंजनसिंगी : येथील गावाच्या पूर्वेस आणि उत्तरेस ई-क्लासची जमीन आहे. त्यावर आठवडी बाजार, कब्रस्तान, बौद्ध ...
पान ३ साठी
अंजनसिंगी : येथील गावाच्या पूर्वेस आणि उत्तरेस ई-क्लासची जमीन आहे. त्यावर आठवडी बाजार, कब्रस्तान, बौद्ध स्मशानभूमी, बुद्धविहार, काही सरकारी भूखंड, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तेथील उर्वरित जमिनीवर बाहेर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करून पक्की घरे बांधलेली आहेत. त्याप्रमाणे गावातील काही नागरिकांनी अतिक्रमण करून बांधकाम करून दुसऱ्यांना भाडेतत्त्वावर राहायला देऊन ते पैसे कमावत आहेत.
अतिक्रमित व बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना या गावांत मूळ रहिवाशांप्रमाणे ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व सुख सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामपंचायतकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा ते लाभ घेत आहेत. त्याकडे ग्रामपंचायत व महसूल विभागाने दुर्लक्ष चालविले आहे. सदर ई- क्लासची मालमत्ता देखभालीसाठी अंजनसिंगी ग्रामपंचायतला हस्तांतरित केलेली आहे. या ई-क्लास जमिनीवर काहींनी अतिक्रमण करून ती विकण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे ते अतिक्रमण ग्रामपंचायत रोखणार की, महसूल विभाग असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.