युवा सेनेने हटविले रस्त्यावरील अतिक्रमण

By admin | Published: February 15, 2016 12:42 AM2016-02-15T00:42:41+5:302016-02-15T00:42:41+5:30

स्थानिक इतवारा बाजार ते टांगापाडाव आणि सक्करसाथ या भागात दर रविवारी रस्त्यावर दुकाने थाटली जातात.

Encroachment on the road removed by the young army | युवा सेनेने हटविले रस्त्यावरील अतिक्रमण

युवा सेनेने हटविले रस्त्यावरील अतिक्रमण

Next

अमरावती : स्थानिक इतवारा बाजार ते टांगापाडाव आणि सक्करसाथ या भागात दर रविवारी रस्त्यावर दुकाने थाटली जातात. त्यामुळे रस्ता अवरुद्ध होऊन नागरिकांना ये-जा करणे कठीण जाते. परिणामी आज युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रवीण हरमकर यांच्या नेतृत्वात रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.
शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणाने वेढले असून अतिक्रमणधारकांवर कोणाचेही अंकूश नाही ही वस्तुस्थिती आहे. रविवारी इतवारा बाजार परिसरात पाय ठेवणे कठीण जाते. त्यामुळे बाजारहाट करावयास येणाऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. रस्त्यालगत थाटल्या जाणारी दुकाने ही अपघातास कारणीभूत ठरणारी असल्यामुळे प्रवीण हरमकर यांनी सदर दुकाने हटविण्याची कारवाई केली. यावेळी पोलिसही पोहचली. पोलिसांनी देखील या कारवाईत हातभार लावला. संजय गव्हाणे, नवीन शर्मा, गोविंद दायमा, गोपाल आसोपा, कीर्ती सेवक, राजू हेरे, पप्पू मुनोत आदींनी अतिक्रमित दुकाने हटविण्याच्या कारवाईत सहभाग घेतला. दर रविवारी अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज राहील.

Web Title: Encroachment on the road removed by the young army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.